डोंगराची राणी शिमल्याजवळील मंडी लोकसभा मतदारसंघात यावेळी जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. भाजपाच्या कंगना रनौत आणि कॉंग्रेसचे विक्रमादित्य यांच्यात अटीतटीची लढत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे कॉंग्रेसचा आत्मविश्वास कमजोर पडला आहे. (Lok Sabha Election 2024)
२०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीत मंडीची जागा भाजपाने जिंकली होती. मात्र, नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ही जागा कॉंग्रेसने जिंकली. परंतु, आता ही जागा ताब्यात घेण्यासाठी भाजपा छातीला माती लावून मैदानात उतरला आहे. भाजपाने शिमला आणि मंडी या मतदारसंघात पंतप्रधान मोदी यांची रॅली आयोजित करून लोकांना आकर्षित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मंडीची जागा गेल्यावेळी भाजपाने जिंकली होती, मात्र काही काळानंतर पोटनिवडणुकीत ती काँग्रेसकडे गेली. (Lok Sabha Election 2024)
सध्या मंत्री आणि आमदारांचे संख्याबळ भाजपासाठी वेगळे आव्हान आहे. हे खरे असले तरी कॉंग्रेसला दगाबाजीची भीती सतावत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या सहा आमदारांनी बंडखोरी केली होती. यामुळे कॉंग्रेसचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांचा पराभव झाला होता. नेमकी हीच भीती कॉंग्रेसला आताही आहे. (Lok Sabha Election 2024)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा हिमाचलमध्ये होत आहेत. शिवाय, कंगना रनौत अभिनेत्री असल्यामुळे जनता त्यांच्याकडे कुतुहलाच्यादृष्टीने पाहत आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे आताही हिमाचल प्रदेशातील विजय मोदी मॅजिकवर अवलंबून आहे. दुसरीकडे, कॉंग्रेस पक्ष केंद्र सरकारवर हिमाचलची उपेक्षा करण्याचा आरोप करून भाजपाला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. हिमाचलमध्ये मोदींची सभा नुकतीच पार पडली. यापूर्वी ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. तेव्हा त्यांनी जवळपास अर्धा डझन जाहीर सभा घेतल्या होत्या. (Lok Sabha Election 2024)
महत्वाचे म्हणजे, मंडी आणि शिमला या दोन्ही मतदारसंघाचा समावेश भाजपाच्या त्या यादीत होता ज्यात १६० पराभूत जागांचा उल्लेख होता. हिमाचलमध्ये भाजपाचे सरकार असूनही मंडीची जागा भाजपाला जिंकता आली नव्हती. मात्र, कॉंग्रेसच्या विजयाचे कारण पक्षाची लोकप्रियता नव्हे तर वीरभद्र सिंग यांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती होती. माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा गृह मतदारसंघ असल्याने मंडीत झालेला पराभव हा भाजपासाठी मोठा धक्का होता. त्यामुळेच यावेळी कंगनाच्या रूपाने नवा चेहरा देऊन हा हरवलेला गड जिंकण्याची योजना आखण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Jitendra Awhad : स्टंटबाजीच्या नादात जीतेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेबांचा फोटो; अमोल मिटकरींचा आरोप)
भाजपाला तुल्यबळ लढत देण्यासाठी काँग्रेसने पुन्हा एकदा मंडीतून विक्रमादित्य सिंग यांना उमेदवारी दिली आहे. शिवाय गेल्या तीन टर्मपासून भाजपाने शिमल्याच्या जागेवर हॅटट्रिक केली असली तरी त्याआधी हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला होता. दीड वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिमला लोकसभा मतदारसंघाने काँग्रेसला १३ आमदार दिले. तर भाजपाचे तीन आमदार निवडून आले. एक अपक्ष आमदार भाजपासोबत आहे. सखू सरकारमध्ये या संसदीय मतदारसंघातून पाच जणांना मंत्री बनविण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024)
भाजपासाठी जमेची बाजू अशी की सध्या संपूर्ण देशात मोदीची जादू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत पुन्हा भाजपाचे सरकार स्थापन होणार आहे हे सर्वजण मान्य करत आहेत. भाजपा उमेदवार कंगना रणौतला मोदी जादू, माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा पाठिंबा आणि स्वतःचा स्टारडम यावर पूर्ण विश्वास असून आपला विजय निश्चित असल्याचे त्यांचा दावा आहे. (Lok Sabha Election 2024)
भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवार आपआपला विजयाचा दावा करीत असल्यामुळे मंडीची जनता भ्रमित झाली आहे. कंगना स्वतःला राज्याची मुलगी समजते आहे. कंगना आणि विक्रमादित्य व्यतिरिक्त, मंडीची लढाई माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि हिमाचलमधील माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबाचे राजकीय भवितव्य देखील ठरवेल. (Lok Sabha Election 2024)
हे मुख्य मुद्दे आहेत
- आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ बांधणे.
- भुभू धारण, जालोरी बोगद्याचे बांधकाम.
- द्रांगमधील मिठाच्या खाणीच्या फाइल्सपुरते मर्यादित.
- जोगिंदरनगरच्या पलीकडे रेल्वे मार्ग विस्तारला नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community