ईव्हीएम मशीनद्वारे करण्यात येत असलेले मतदान शंभर टक्के सुरक्षित आहे, असे आश्वासन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नागरिकांना दिले. शुक्रवारी, (१९एप्रिल) त्यांनी मतदारांच्या ईव्हीएम मशीनबाबत असलेल्या शंकांना उत्तरे दिली. ( Lok Sabha Election 2024)
यावेळी ते म्हणाले की, तांत्रिक, प्रशासकीय आणि प्रक्रियाभिमुख…अशा अनेक सुरक्षा उपाययोजनांमुळे ईव्हीएम मशीन १०० टक्के सुरक्षित आहे. न्यायलयातही याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे, आम्ही निर्णयाची वाट पहात आहोत. यंत्रांना काहीही होऊ शकत नाही, प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार सहभागी होत आहेत.मॉक पोल केल जात आहे, ईव्हीएम मशीनबाबत लोकांनी उपस्थित केलेल्या शंकांना उत्तर देताना ते म्हणाले.
(हेही वाचा – Rahul Shewale यांनी घेतली राज ठाकरे यांची सदिच्छा भेट )
कोणत्याही गोष्टीवर शंका घेऊ नका…
मतदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, ”तांत्रिक, प्रशासकीय आणि प्रक्रियाभिमुख अशा अनेक सुरक्षा उपाययोजना आहेत. फक्त मतदानाचा आनंद घ्या. मतदानाचा आनंद घेण्याची ही वेळ आहे, तुम्ही मतदान करताच ते नोंदवले जाईल. कोणत्याही गोष्टीवर शंका घेऊ नका “, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
सर्वच नागरिकांचा हा अधिकार
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ मतदारसंघांमध्ये पार पडले. “पाऊस पडत असला, तरी लोक खरोखरच मोठ्या संख्येने बाहेर येत आहेत, असे वृत्त आम्हाला मैदानातून मिळत आहे. महिला, तरुण, वृद्ध… प्रत्येकजण मतदान केंद्रांकडे धाव घेत आहे. युवक आणि महिला मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाची चांगली टक्केवारी सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. पेट्रोल पंप, बँका, टपाल कार्यालये अशा अनेक संस्थांनी आमच्याबरोबर काम केले असून तरुण, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग सर्वच नागरिकांचा हा अधिकार आहे,” असे कुमार म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community