देशातील लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील (Lok Sabha Election 2024) विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणादेखील निवडणूक आयोगाने केली आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक होणार आहे. (Akola West Assembly Constituency)
या मतदारसंघाचे आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाले होते. त्यामुळे ही जागा रिक्त होती. आता या विधानसभा लोकसभा मतदारसंघावर २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर या मतदारसंघाचा निकाल हा ४ जूनला लागणार आहे. देशभरात लोकसभा निवडणुका असल्याने या मतदारसंघातील विधानसभेचा निकालदेखील देशभरातील लोकसभेच्या निकालासोबतच लावण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. देशभरामध्ये सात टप्प्यामध्ये निवडणुका पार पडणार असून त्यातील पाच टप्प्यात महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांचा मार्ग सोपा; कारण…)
पत्रकार परिषदेत घोषणा
अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे घेण्यात येत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील रिक्त जागेवर पोटनिवडणूक कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, आता निवडणूक आयोगाच्या वतीने देशभरातील सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली. या घोषणेबरोबरच अकोला पश्चिम या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची देखील घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत घोषणा केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community