Lok Sabha Election 2024: राज्यात दुष्काळ, आचारसंहिता शिथिल करा; राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती

129
Lok Sabha Election 2024: राज्यात दुष्काळ, आचारसंहिता शिथिल करा; राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती
Lok Sabha Election 2024: राज्यात दुष्काळ, आचारसंहिता शिथिल करा; राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती

संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू असताना, त्यावर अवकाळीचं सावट आहे. तर काही ठिकाणी भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या (Maharashtra Lok Sabha Election 2024) 48 जागांसाठीच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने (Maharashtra Government) निवडणूक आयोगाकडे (Election Commission) आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली आहे. यासाठी राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी बुधवारी (२२ मे) निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. (Lok Sabha Election 2024)

आचारसंहितेत महाराष्ट्राला दिलासा द्यावा

आचारसंहितेमुळे अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना मदत करणं सरकारला शक्य नसल्याचं कारण त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळत नाही. याशिवाय पाणीटंचाईनं त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणं शक्य होत नाही. आचारसंहितेमुळे (Lok Sabha Election 2024) महानगरपालिका आणि महानगरपालिकांच्या कामावर परिणाम होत आहे, त्यामुळे निवडणूक आयोगानं आचारसंहितेत महाराष्ट्राला दिलासा द्यावा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसेच, विरोधक सातत्यानं सरकारवर निशाणा साधत आहेत. शेतकऱ्यांना मदत केली नाही आणि खेड्यापाड्यात पाणी पोहोचवलं नाही, असा आरोप सातत्यानं विरोधकांकडून केला जात आहे, असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. (Lok Sabha Election 2024)

आचारसंहितेमुळे सरकारचं कामकाज पूर्णपणे ठप्प

पीडित आणि सरकारी सुविधांसाठी झगडणाऱ्या लोकांना मदत करता यावी, यासाठी मुख्य सचिवांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाचं लक्ष वेधलं आहे. देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) जाहीर होताच, निवडणूक आचारसंहिता लागू होते. तर, नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत ती लागू राहते. या काळात विद्यमान सरकार कोणत्याही प्रकारची नवी घोषणा करू शकत नाही. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. निवडणूक निकालानंतर 8 ते 10 दिवसांत नवं सरकार स्थापन होईल. आचारसंहितेमुळे सरकारचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालं आहे. मुख्य सचिवांच्या पत्रानंतर आचारसंहितेच्या निर्बंधातून काहीसा दिलासा मिळू शकतो, असं मानलं जात आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.