Lok Sabha Election 2024 : कोटक यांचा पत्ता कापला, चर्चेत नसलेल्या मिहिर कोटेचा यांना भाजपाकडून उमेदवारी  

कोटेचा यांचे नाव आजवर कधीही चर्चेत नव्हते. मात्र, पत्ता कापला गेला असला तरी कोटक यांना राज्यातील राजकारणात सक्रिय करून मुलुंड तथा भांडुप विधानसभेत उतरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

1287
Lok Sabha Election 2024: कोटक यांचा पत्ता कापला, चर्चेत नसलेल्या मिहिर कोटेचा यांना भाजपाकडून उमेदवारी  
Lok Sabha Election 2024: कोटक यांचा पत्ता कापला, चर्चेत नसलेल्या मिहिर कोटेचा यांना भाजपाकडून उमेदवारी  

>> विशेष प्रतिनिधी, मुंबई

उत्तर पूर्व मुंबई अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील (Mumbai Lok Sabha Constituencies) (Lok Sabha Election 2024) भाजपचे खासदार मनोज कोटक यांचा अखेर पत्ता कापला गेला. कोटक यांच्यावर मागील काही वर्षांपासून भाजपा पक्षश्रेष्ठी नाराज होते आणि तेव्हापासून या मतदारसंघात नवीन उमेदवार दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर कोटक यांचा पत्ता कापून मुलुंड विधानसभेतील आमदार मिहिर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, मात्र कोटेचा यांचे नाव आजवर कधीही चर्चेत नव्हते. पत्ता कापला गेला असला तरी कोटक यांना राज्यातील राजकारणात सक्रिय करून मुलुंड तथा भांडुप विधानसभेत उतरवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून सन २०१९च्या निवडणुकीत तत्कालिन खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कापून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर झाली होती. शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपाने सोमय्यांचा पत्ता कापून कोटक यांना उमेदवारी दिली होती आणि कोटक यांनी ५ लाख १४ हजार ५९९ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा पराभव केला होता. मात्र मागील पाच वर्षांत कोटक यांनी या मतदारसंघाची बांधणी अधिक प्रभावीपणे करून विविध विकासकांमांचा पाठपुरावा करत विकासकामे मार्गी लावली. तसेच संसदेतही मुंबईतील जनतेशी निगडीत विविध समस्यांवर आवाज उठवतानाच विविध विधेयकांवर पक्षाची बाजूही चांगल्याप्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात कोटक यांनी संसदेत आपल्या कामाची आणि कार्याची चुणूक दाखवून दिली होती.

(हेही वाचा – BMC : महापालिका करणार व्हेईकल माऊंटेड लिटर पिकर मशीन्सचा वापर)

अत्यंत विश्वासू सहकारी
मागील काही महिन्यांपासून कोटक यांच्यावर भाजपा पक्ष श्रेष्ठी नाराज असल्याने त्यांच्या जागी अनेक उमेदवाराचा विचार केला जाईल अशी चर्चा होती. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपसाठी अनुकूल असल्याने या मतदारसंघात कधी देवेंद्र फडणवीस तर कधी पियुष गोयल , तर कधी पराग शहा यांच्या नावाची चर्चा होती. परंतु भाजपाच्या दुसऱ्या यादीत या मतदारसंघातून मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मिहिर कोटेचा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गटातील असून त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून मानले जात आहेत.

भाजपाने चांगल्याप्रकारे बांधणी सुरू केली
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मुलुंड, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, मानखुर्द शिवाजी नगर आदी सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून यातील भांडुप, विक्रोळी मतदारसंघात शिवसेनेचे अनुक्रमे रमेश कोरगावकर आणि सुनील राऊत हे आमदार आहेत, तर मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे आमदार आहेत. तर मुलुंड, घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम या विधानसभा क्षेत्रात भाजपचे अनुक्रमे मिहिर कोटेचा, पराग शहा आणि राम कदम असे तीन आमदार आहेत. त्यामुळे तीन मतदारसंघात भाजपाचे प्राबल्य असून आता शिवाजी नगर, मानखुर्द, भांडुप आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघांतही भाजपाने चांगल्याप्रकारे बांधणी सुरू केली आहे. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ असल्याने भाजपसाठी हा मतदारसंघ खूपच पोषक मानला जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.