राहुल गांधी यांच्याकडून भाषण करताना नक्षलवादी भाषेचा वापर होत असल्याने या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांत कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी उद्योगपती ५० वेळा विचार करतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यावर टीका केली. मोदी यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचे राजकारण केल्याचा तसेच लोकसभेची जागा वडिलोपार्जित मालमत्ता समजल्याबाबतही हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीनिमित्त आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. (Lok Sabha Election 2024)
मोदी म्हणाले, ”काँग्रेसच्या शहजाद्यांची भाषा पाहता कोणताही उद्योगपती या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात गुंतवणूक करण्यापूर्वी ५० वेळा विचार करेल. नक्षलवाद्यांकडून बोलली जाणारी भाषा काँग्रेसचा शहजादा वापरत असून नवनवीन पद्धतींद्वारे पैसे उकळत आहे. या शहजादांकडून वापरल्या जाणाऱ्या उद्योगविरोधी भाषेशी आपण सहमत आहोत का, हे काँग्रेसचे मुख्यमंत्री व ‘इंडि’ आघाडीने स्पष्ट करण्याचे आव्हान मी देत आहे.” (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Sanjay Shirsat: खुर्चीच्या अट्टाहासामुळेच पक्षात फूट पडली, संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा )
मम्मीच्या मतदारसंघाकडे धाव
रायबरेली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्णयाची खिल्ली उडवित मोदी म्हणाले की, हा माझ्या मम्मीचा मतदारसंघ असल्याचे सांगत शहजादाने रायबरेलीत धाव घेतली. अगदी ८ वर्षांचा मुलगाही असे करत नाही. लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोपही त्यांनी काँग्रेसवर केला. काँग्रेस सरकारच्या काळात देशातील सुमारे १८ हजार गावांची अवस्था १८ व्या शतकातील गावांप्रमाणे होती, असे ते म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community