लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोलमध्ये पीएम मोदी तिसऱ्यांदा हॅट्ट्रिक करताना दिसत आहेत. एका पोलमध्ये NDA ४००च्या पुढे जात आहे. १३ एक्झिट पोलच्या सर्वेक्षणानुसार एनडीएला ३६५ तर INDIला १४५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना ३२ जागा मिळू शकतात. यावेळी भाजपा २०१९ मध्ये जिंकलेल्या ३०३ जागांचा आकडा पार करू शकतो. (Lok Sabha Election 2024)
उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि दिल्ली या हिंदी हार्टलँड राज्यांमध्ये भाजपाला एकतर्फी आघाडी मिळण्याचा अंदाज आहे. या राज्यांमधील ९०% पेक्षा जास्त जागांवर भाजपाचा विजय निश्चित मानला जात आहे, तर मध्य प्रदेशातील २९ जागांपैकी भाजपला २८ ते २९ जागा मिळतील आणि राजस्थानमध्ये २५ जागांपैकी २३ ते २५ जागा मिळतील. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Vitthal Mandir : तब्बल ७९ दिवसांनंतर विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमली भाविकांची मांदियाळी )
पोलनुसार, बिहार, झारखंड, राजस्थान आणि महाराष्ट्रात एनडीएला २९ जागा कमी पडण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये उलथापालथ होताना दिसत आहे. येथे भाजपाला एकूण ४२ जागांपैकी २६ ते ३१ जागा मिळण्याची शक्यता आहे. ओडिशा आणि तेलंगणामध्ये भाजपाच्या जागा दुप्पट होऊ शकतात.
सर्वेक्षणात NDAला बहुमत
पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. प्रत्येक राज्यातील राजकीय तज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार आणि सर्वसामान्यांना तेथील राजकीय परिस्थिती, त्यातून निर्माण होणारी समीकरणे, प्रमुख समस्या आणि राज्य-केंद्राच्या योजनांचा होणारा परिणाम यानुसार, यावेळी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला २८१-३५० जागा मिळू शकतात आणि विरोधी आघाडी इंडि ब्लॉकला १४५-२०१ जागा मिळू शकतात. (Lok Sabha Election 2024)
अमित शहा (21 मे रोजी संबलपूर, ओडिशा)
१५-२०दिवसांपूर्वी भाजपाला १८० जागा मिळतील असे वाटत होते. आता राज्यातून मिळालेल्या अहवालानुसार, फक्त १५० जागा मिळण्याची शक्यता वाटत आहे.
राहुल गांधी (17 एप्रिल रोजी गाझियाबाद, उत्तर प्रदेश)
भाजपा आणि काँग्रेसच्या २ बड्या नेत्यांचे हे दावे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करण्यात आले होते. १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत ७ टप्प्यांत ५४२ जागांवर मतदान संपले आहे. निकाल ४ जून रोजी आहे. त्यानंतर या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे समोर येईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community