लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीत सांगलीमध्ये अखेर फूट पडली आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी परस्पर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली, तेव्हापासून काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. अखेरपर्यंत विश्वजित कदम यांनी ही जागा काँग्रेसची असून येथून उबाठाने माघार घ्यावी, अशी मागणी केली. परंतु अखेरपर्यंत उबाठा यात ठाम राहिला, त्यामुळे शेवटी विशाल पाटील यांनी अखेर अपेक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे सांगलीत मविआमध्ये फूट पडली.
महाविकास आघाडी सांगलीच्या उमेदवारबाबतचा निर्णय बदलेल अशी आशा विश्वजित कदम यांना आहे. त्यासाठी नागपूर येथे काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. परंतु तत्पूर्वी विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) अर्ज दाखल केला आहे. त्यात मंगळवारी काँग्रेस जिल्ह्यात मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन करणार आहे. यानंतर विशाल पाटील आणखी एक अर्ज भरतील जो काँग्रेसकडून असेल. काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारी मिळेल या आशेवरही नेते आहे. आज मोजक्या कार्यकर्त्यांसह विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. परंतु मंगळवारी सांगलीत शक्तिप्रदर्शन करत आणखी एक उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबाबत विशाल पाटील यांनी माहिती दिली की, सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल करणार आहे.
Join Our WhatsApp Community