नाशिकचे तापमान पुन्हा 40 अंश डिग्री सेल्सिअसवर गेले आहे. त्यामुळे सोमवारी, (२० मे) रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर या वाढत्या तापमानाचा काय परिणाम होतो याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. नाशिकमध्ये गेल्या 20 दिवसांपासून सातत्याने राजकीय वातावरण गरम झाले होते. पण आता सोमवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधीच नैसर्गिक हवामानादेखील गरम झाले आहे. (Lok Sabha Election 2024)
मधल्या कालावधीमध्ये नाशिकचे तापमान हे 31 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी झाले होते, तर जिल्ह्यात विविध ठिकाणी बेमोसमी पाऊस पडला होता. त्यामुळे या तापमानात अजून काहीशी घट झाली होती, तर पुन्हा एकदा राजकीय वातावरण शांत झाल्यानंतर नैसर्गिक वातावरण तापले आहे. नाशिक जिल्ह्यातील तापमानामध्ये मागील दोन दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. रविवारी, (19 मे) सायंकाळी नोंदविण्यात आलेल्या किमान तापमानामध्ये वाढ झाली असून जिल्ह्यामध्ये 40.3 अंश डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आली आहे, तर शनिवारी, (१८ मे) तापमान 39 अंश डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुंबईत ५,८३६ वाहनांची झाडाझडती)
नैसर्गिक तापमानामध्ये वाढ होऊ लागल्यामुळे सोमवारी होणाऱ्या लोकसभा मतदानाच्या वेळी याचा काय परिणाम होतो याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community