केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवार, 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) घोषणा केली. त्यावेळी महराष्ट्रातील 48 जागांवर कधी निवडणूक होणार याचेही नियोजन जाहीर केले. त्यावरून नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार यांचा विजयाचा मार्ग सोपा झाला आहे.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 27 मार्च ही शेवटची तारीख आहे आणि 30 मार्च अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर आणि चंद्रपूर या पाच मतदार संघात निवडणूक होणार आहे. अजून महाविकास आघाडीने एकाही जागेवर उमेदवार घोषित केला नाही. याउलट पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत ५ मतदारसंघापैकी नागपूर येथे नितीन गडकरी आणि चंद्रपूर येथे सुधीर मुनगंटीवार यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे.
गडकरी, मुंगटीवार यांना प्रचारासाठी महिना
या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ ११ दिवस उरले आहेत त्यात महाविकास आघाडीचे अजून उमेदवार निश्चित झाले नाहीत. त्यामुळे या टप्प्यातीळ गडकरी आणि मुनगंटीवार यांना प्रचारासाठी महिनाभर मिळाला आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार घोषित होण्यासाठी २७ मार्च गृहीत धरली तर मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला २३ दिवस मिळतील. अशा प्रकारे महाविकास आघाडीच्या उमेदवाराची गोची होणार आहे.
Join Our WhatsApp Community