Lok Sabha Election 2024: एकाही लोकसभा नेत्याचा यादीत समावेश नसला, तरी महाराष्ट्रातील ‘या’ माजी मंत्र्यांना यूपीतून BJPची उमेदवारी, जाणून घ्या …

पहिल्या यादीत ज्या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे त्यात वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गांधीनगरमधून अमित शहा, उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यांचा समावेश आहे.

281
Lok Sabha Election 2024: एकाही लोकसभा नेत्याचा यादीत समावेश नसला, तरी महाराष्ट्रातील 'या' माजी मंत्र्यांना यूपीतून BJPची उमेदवारी, जाणून घ्या ...
Lok Sabha Election 2024: एकाही लोकसभा नेत्याचा यादीत समावेश नसला, तरी महाराष्ट्रातील 'या' माजी मंत्र्यांना यूपीतून BJPची उमेदवारी, जाणून घ्या ...

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपाच्या वतीने शनिवारी पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी १९५ लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. यात १६ राज्यांतील उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकाही लोकसभा नेत्याचा समावेश नसला तरी महाराष्ट्रातील माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्या नावाचा समावेश असला तरी त्यांना उत्तर प्रदेशातील जैनापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आहे. जाणून घेऊया कृपाशंकर सिंह यांच्या राजकीय कारकीर्दिविषयी –

 ५०पेक्षा कमी असलेले ४७ उमेदवार
जाहीर झालेल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. पहिल्या यादीत ज्या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे त्यात वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गांधीनगरमधून अमित शहा, उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक यांचा समावेश आहे. पहिल्या यादीत २८ महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत ४७ असे उमेदवार आहेत. ज्यांचे वय ५० पेक्षा कमी आहे. यादीत  २७ उमेदवार एससी तर १८ उमेदवार एसटी प्रवर्गातील आहेत. तर ५७ उमेदवार हे ओबीसी असल्याचे तावडे यांनी सांगितले.

(हेही वाचा – Indian Apps: गुगलने प्ले स्टोअरवरून ‘हे’ १० भारतीय अॅप्स हटवले, केंद्र सरकार घेणार कठोर भूमिका )

कोण आहेत कृपाशंकर सिंग?
कृपाशंकर सिंग हे काँग्रेसचे मुंबईतील वरिष्ठ नेते आहेत. उत्तर भारतीयांची मतं काँग्रेसकडे वळवण्यात कृपाशंकर सिंग यांचा वाटा मोलाचा मानला जातो. काँग्रेसच्या सत्ताकाळात २००४ साली कृपाशंकर सिंग हे राज्यमंत्री होते. २००९ साली विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं. त्याचं बहुतांश श्रेय कृपाशंकर सिंग यांना जातं, असं मानलं जातं. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद, आमदार, राज्यमंत्री, अशी पदं काँग्रेसमध्ये कृपाशंकर सिंग यांनी भूषवली आहेत.

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अडचणीत
बेहिशोबी मालमत्ता आणि काडतुसं सापडल्याप्रकरणी कृपाशंकर सिंह मधल्या काळात अडचणीत आले होते. तेव्हा पासूनच ते सक्रिय राजकारणातून ते बाजूला झाले, मात्र २०१९मध्ये जम्मू-काश्मीरमधून आर्टिकल ३७० व ३५A हटविण्यात आल्यानंतर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर कृपाशंकर सिंह यांनी सवाल केले होते.

जुलै २०२१मध्ये भाजपामध्ये प्रवेश
कॉंग्रेसच्या या भूमिकेच्या निषेधार्थ त्यांनी कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सोपवला होता. त्यानंतर ते कोणत्याच पक्षात सामील झाले नव्हते, मात्र त्यांनी ७ जुलै २०२१ला भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केला होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.