आधी तिकीट मिळवण्यासाठी धावपळ मात्र आता या लोकसभा उमेदवारांना कागद पत्राचं टेन्शन आलं आहे. माढ्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी उत्पन्नाचे स्रोत न दाखविल्याचा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या उमेदवारी अर्जावर एका अपक्ष उमेदवाराने हरकत घेतली होती. सोलापूर राखीव आणि माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या () निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्जांची शनिवारी छाननी झाली. परंतु, निवडणूक अधिकाऱ्यांनी हरकत फेटाळत मोहिते-पाटील यांची उमेदवारी अर्ज मंजूर केला असल्यामुळे राजकीय गटात चर्चाना उधाण आले आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Piyush Goyal मनोरीतील मच्छिमारांना भेटले; तेव्हा मात्र तोंडाला लावला नाही रुमाल )
या अर्जांच्या छाननीच्यावेळी सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या अर्जाला अपक्ष उमेदवार सचिन म्हस्के यांनी हरकत घेतली. प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांचे कलम नमूद केले नाही. तर दुसरे अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यांनी, प्रणिती शिंदे यांच्या अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती असल्याची हरकत घेतली आहे. त्यांच्या जातीच्या दाखल्याबाबतही हरकत घेण्यात आली आहे. सोलापूर राखीव मतदारसंघात ४१ तर माढा मतदारसंघात एकूण ४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Election : अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करू शकता आणि मतदानही करू शकता; काय म्हटले निवडणूक आयोगाने? )
भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. सातपुते यांच्या जातीचा दाखला बनावट असल्याचा आक्षेप घेतला आहे. दुसरे अपक्ष उमेदवार भारत कंदकुरे यांनी जातीच्या दाखल्यावर राम सातपुते यांच्या अर्जाला हरकत घेतली आहे. सातपुते यांचे जात वैधता प्रमाणपत्र २०१२ सालचे आहे. त्यांचे अभियांत्रिकी शिक्षण २०१५ मध्ये झाले होते. त्यांनी २०१३ साली वाहने खरेदी केली. ऊसतोड मजुराचा मुलगा असल्याचा दावा करणारे सातपुते यांच्याकडे एवढी वाहने कशी ? तसेच त्यांच्या पत्नी संस्कृती यांच्या नावाने संपत्ती नमूद करताना त्यांच्या नावाने पॕन कार्ड नाही. तर मग त्यांच्या नावाने संपत्ती कशी आली, असा सवाल हरकतीद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. या सर्व हरकतींवर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. (Lok Sabha Election 2024)
हेही पाहा –
Dhairyasheel Mohite P
Join Our WhatsApp Community