महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विदर्भात महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची रेलचेल पाहण्यास मिळू लागली आहे. पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये (Lok Sabha constituencies) १९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाला पाहता प्रचाराची रंगत आता वाढू लागली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीचे बडे नेते आज विदर्भात येणार असल्याने विदर्भात आज नेत्यांची रेलचेल पहावयास मिळणार आहे. (Lok Sabha Election 2024)
नागपूर लोकसभा मतदारसंघातील (Lok Sabha constituencies) भाजपचे उमेदवार नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आज नागपुरात प्रचार करणारा आहेत. तर वर्धा मतदार संघावर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार हजर राहणार आहेत. यवतमाळ लोकसभा मतदारसंघात संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार (Rohit Pawar) देखील हजर राहून जाहीर सभा घेणार आहेत. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा- Benjamin Netanyahu: इस्रायलमध्ये दहशतवादी वाहिनीच्या प्रसारणावर बंदी, पंतप्रधान नेत्यनाहू यांचे आदेश)
शिंदे गटाचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे (Lok Sabha constituencies) उमेदवार प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आज विदर्भात मोठ्या प्रमाणात व्हीव्हीआयपी नेत्यांची वर्दळ दिसून येत आहे. एकूणच विदर्भातल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उडण्यास आता सुरुवात झाली आहे. त्यामुळेच आता विदर्भात नेत्यांचे येणे जाणे येणाऱ्या काळात वाढलेली दिसून येऊ शकते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देखील दहा तारखेला रामटेक तसेच १४ तारखेला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी (Lok Sabha constituencies) प्रचार करणार आहेत. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community