Lok Sabha Election 2024: खजुराहोमध्ये सपाची वाट अवघड

विधानसभेच्या सर्व आठ जागा भाजपच्या ताब्यात

168
lok Sabha Elction 2024 : महाराष्ट्रातील पेच लवकर सोडवला जाईल; जयंत पाटील यांची माहिती
lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील पेच लवकर सोडवला जाईल; जयंत पाटील यांची माहिती
कॉग्रेसने मध्यप्रदेशातील खजुराहोची जागा सपा लढविणार आहे. परंतु, या लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघात येणा—या विधानसभेच्या सर्व आठ जागा भाजपच्या ताब्यात आहेत. यामुळे सपाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या या जागेवरून सपाला लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) चांगल्या निकालाची आशा आहे.
 लोकसभेच्या निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) उत्तरप्रदेशात (Utaar pradesh) समाजवादी पक्ष (Samajvadi parti) आणि कॉग्रेस यांच्यात समझोता झाला आहे. सपाने यूपीत कॉग्रेसला 17 जागा दिल्या आहेत. या बदल्यात कॉग्रेसने सपाला मध्यप्रदेशातील खजुराहोची जागा दिली आहे. (Lok Sabha Election 2024)
लोकसभेच्या निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) इंडी आघाडीतील दोन घटक पक्ष समाजवादी पक्ष (Samajvadi parti) आणि कॉग्रेस यांच्यात उत्तरप्रदेशात (Utaar pradesh) समझोता झाला आहे. 80 जागांच्या यूपीत सपाने कॉग्रेससाठी 17 जागा सोडल्या आहेत. उर्वरित जागा सपा आणि अन्य पक्षांकडून लढविल्या जाणार आहेत. (Lok Sabha Election 2024)
उत्तरप्रदेशात (Utaar pradesh) झालेल्या समझोताच्या बदल्यात कॉग्रेसने सपासाठी मध्यप्रदेशातील लोकसभेची एक जागा सोडली आहे.
या समझोत्यानुसार सपा आता मध्यप्रदेशातील खजुराहोची जागा लढविणार आहे. परंतु, सपासाठी विजयाचा मार्ग फार अवघड आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण, खजुराहो लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या(Lok Sabha Election 2024) आठ जागा मोडतात.
खजुराहोतील आठही आमदार भाजपचे
मध्यप्रदेश विधानसभेची निवडणूक नुकतीच झाली असून येथे भाजपची सत्ता आली आहे. महत्वाचे म्हणजे, खजुराहो (khaujuraho) अंतर्गत मोडणा—या विधानसभेच्या आठही जागांवर भाजपचे आमदार निवडून आले आहेत. आठ आमदारांच्या प्रभावाला कमी करून सपाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अखिलेश यादव यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.(Lok Sabha Election 2024)
यूपी—एमपीच्या बॉर्डरमुळे सपाला आशा
खजुराहो (khaujuraho) मतदारसंघ हा उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर आहे. यामुळे सपाला या ठिकाणी विजयाची अपेक्षा आहे. छतरपूर, कटनी आणि पन्ना यांना जोडलेला खजुराहो (khaujuraho) लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा मजबूत बालेकिल्ला आहे. भाजपच्या नावाने जो उमेदवार आला, तिथून जनतेने त्यांना विजयाच्या सिंहासनावर बसवले. ही लोकसभेची जागा 1999 पासून सातत्याने भाजपकडे आहे.
भाजपचा उमेदवार बाहेरचा असला तरी समर्थन
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने(Lok sabha Bjp) मुरैना भागातील डॉ. विष्णू दत्त शर्मा (व्हीडी शर्मा) यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्यासमोर राजनगर राजघराण्यातील महाराणी कविता सिंह काँग्रेसकडून निवडणूक लढवत होत्या. मात्र, जनतेने कविता सिंह यांना पराभूत करून भाजपच्या उमेदवाराला विजयी बनविले. व्हीडी शर्मा यांनी ही निवडणूक सुमारे पाच लाख मतांनी जिंकली आहे. खजुराहो (khaujuraho) लोकसभा जागेवर बाहेरच्या चेहऱ्यांचा काहीसा अंतर्गत विरोध झाला असला, तरी स्थानिक लोकांच्या मनात घर करून बसलेल्या भाजपचा उमेदवार निवडणुकीच्या(Lok sabha Bjp) रिंगणात असताना बाहेरच्या चेहऱ्यांनाही पूर्ण पाठिंबा मिळतो.
भाजपला कॉग्रेस—सपापेक्षा दुप्पट मते
2019 च्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर लक्षात येते की, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या(Lok sabha Bjp) व्हीडी शर्मा यांना सपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांपेक्षा दुप्पट मते मिळाली होती. 2019 मध्ये सपाचे उमेदवार वीरसिंह पटेल यांना केवळ 40,077 मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या कविता सिंह यांना 3 लाख 18 हजार 735 मते मिळाली. याउलट, भाजपच्या व्हीडी शर्मा यांना 8 लाख 11 हजार 135 मते मिळाली. कॉग्रेस आणि सपाच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांची बेरीज केली तरी शर्मा यांची बरोबरी होत नाही. यामुळे, काँग्रेस आणि सपा एकत्र निवडणूक लढली तरी भाजपपुढे टिकाव लागणार नाही, अशी चर्चा आहे. खजुराहो मतदारसंघात यादव आणि पटेल समाजाचा खूप प्रभाव आहे.
खजुराहो अंतर्गत येणा—या विधानसभेच्या आठ मतदारसंघात चांदला, रामनगर, पवई, गुनौर, पन्ना, विजयराघवगड, मुदवारा आणि बहोरीबंदचा समावेश आहे.
एकूण मतदार: 18,31,837
पुरुष मतदार: 9,65,170
महिला मतदार : 8,66,649
तृतिय पंथी : 26
हेही पहा-
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.