Lok Sabha Election 2024: व्हीव्हीपॅटसोबत सगळ्या स्लीपची मोजणी करण्यासाठी याचिका; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार, निवडणूक आयोगाला नोटीस

व्हीव्हीपॅट स्लीपची गणना करण्याची मागणी केल्यानंतर वकील नेहा राठी यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वाला आव्हान देण्यात आलं.

186

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. त्यातच ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रियेला विरोधकांनी मोठा विरोध केला आहे, मात्र निवडणूक आयोग ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यावर ठाम आहे. ईव्हीएमसह निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट स्लीप पडताळून पाहते, मात्र सगळ्याच व्हीव्हीपॅट स्लीपची मोजणी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अरुण अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली होती. त्यांच्या याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला सोमवारी नोटीस बजावली आहे.

सगळ्या व्हीव्हीपॅटची मोजणी करण्याची मागणी
विरोधकांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केल्यानंतर निवडणूक आयोगानं ईव्हीएम मशीनला व्हीव्हीपॅट जोडण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र व्हीव्हीपॅट मशीन सगळ्याच ईव्हीएमला जोडण्यात येत नाही. त्यामुळे वकील तसेच सामाजिक कार्यकर्ते अरुण अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत सगळ्याच व्हीव्हीपॅट स्लीपची मोजणी करण्याची मागणी केली होती. यावेळी न्यायमूर्ती बी आर गवई यांच्या नेतृत्वातील खंडपीठानं याचिकाकर्त्याचे वकील गोपाल शंकरनारायणन यांची बाजू ऐकूण घेतली. त्यानंतर केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावून त्यांचं उत्तर मागवलं आहे.

(हेही वाचा – IPL 2024, MI vs RR : मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव, गुण तालिकेतही तळाला  )

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वाला आव्हान
व्हीव्हीपॅट स्लीपची गणना करण्याची मागणी केल्यानंतर वकील नेहा राठी यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वाला आव्हान देण्यात आलं. व्हीव्हीपॅट पडताळणी क्रमवार म्हणजे एकापाठोपाठ एक केली जावी. मात्र त्यामुळे प्रचंड विलंब होतो. निवडणूक आयोग ५० व्हीव्हीपॅट मधून स्लीप मोजण्यासाठी पथकात १५० अधिकारी तैनात करू शकते, मात्र त्यामुळे मोजणी ५ तासांत करणं सहज शक्य होते. दुसरीकडं निवडणूक आयोगाच्या वेळेनुसार २५० तास म्हणजे जवळपास ११ ते १२ दिवस लागतील, असंही या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.