लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) सहाव्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. या ५८ जागांपैकी २०१९ मध्ये एनडीएने तब्बल ४० जागांवर विजय मिळवला होता. यात दिल्लीतील सर्व ७ आणि हरियाणातील सर्व १० जागा जिंकल्या होत्या. २५ मे आणि १ जून या दोन शेवटच्या टप्प्यांत ११५ जागांसाठी मतदान होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने (BJP) हरियाणा (Haryana), हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि दिल्लीतील सर्वच्या सर्व तर पंजाबमध्ये फक्त दोन जागा जिंकल्या होत्या. (Lok Sabha Election 2024)
केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ
सध्या दिल्लीतील सातच्या सात जागांवर भाजपचे खासदार आहेत. मात्र यावेळी काँग्रेस आणि आपच्या आघाडीचे आव्हान भाजपसमोर आहे. कथित दारु घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना तुरुंगात टाकले तरी न्यायालयाने अंतरिम जामीन त्यांना दिल्यावर ते प्रचारात प्रचंड सक्रिय झाले. याच दरम्यान आप खासदार स्वाती मालीवाल यांच्या मारहाणीवरून केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Lok Sabha Election 2024)
सहाव्या टप्प्यातील काही प्रमुख उमेदवार
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (अनंतनाग-राजौरी), मंत्री धर्मेंद्र प्रधान (संबलपूर, ओडिशा), मंत्री राव इंद्रजीत व अभिनेता राज बब्बर (गुडगाव), केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर (फरीदाबाद), माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी (सुलतानपूर), मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार (ईशान्य दिल्ली), नवीन जिंदाल (कुरुक्षेत्र), बासुरी स्वराज (नवी दिल्ली), मनोहरलाल खट्टर (कर्नाल), कुमारी शैलजा आणि अशोक तंवर (सिरसा), अरविंद शर्मा व दीपेंद्रसिंह हुड्डा (रोहतक). (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community