आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे दिल्लीत अमित शहा यांची भेट घेत आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीतील जागा वाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला किती जागा मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जास्तीत जास्त लाढण्याचा भाजप प्रयत्न करत असून त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांना कमी जागा मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्षदेखील महायुतीमध्ये सामील होत आहे. त्यामुळे या पक्षालादेखील एक किंवा दोन जागा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा वाटा आणखी कमी होणार आहे. त्यामुळेच अजित पवार हे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या सागर या बंगल्यावर दाखल झाले असल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा – Pashupati Paras : पशुपती पारस यांचा केंद्रीय मंत्रीमंडळातून राजीनामा; बिहारमध्ये जागावाटपात डावलल्याचा आरोप)
जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत
मुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हेदेखील देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या चारही नेत्यांमध्ये आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात बाबत सविस्तर चर्चा सुरू आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Mumbai BJP President Ashish Shelar) यांनी मुंबईमधील सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या आधीच त्यांनी फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या ठाणे मधील निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे मधील निवासस्थानी देखील शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत खासदार भावना गवळी यांच्यासह राज्यातील सेनेच्या खासदारांनी त्यांची भेट घेतली. आगामी काळात जाहीर होणाऱ्या जागा वाटपासंदर्भात या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जागा वाटपात आपला मतदार संघ हा कायम राहील अशी आशा या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली आहे. निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे जागा वाटपाचा अंतिम निर्णय हा लवकर होणे अपेक्षित आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community