Lok Sabha Election 2024: पुणे जिल्ह्यात २ टप्प्यांत मतदान; मावळ, शिरूरसाठी १८ आणि बारामतीसाठी १२ एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया

बारामती लोकसभेसाठी १२ एप्रिलपासून, तर पुणे, मावळ आणि शिरूर मतदारसंघासाठी १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी रविवारी दिली.

175
Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यात १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) जाहीर झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यात यंदा २ टप्प्यांत निवडणुका आहेत. पहिल्या टप्प्यात बारामती मतदारसंघाची, तर दुसऱ्या टप्प्यात पुणे, मावळ आणि शिरूर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. बारामती लोकसभेसाठी १२ एप्रिलपासून, तर पुणे, मावळ आणि शिरूर मतदारसंघासाठी १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी रविवारी दिली.

बारामती मतदारसंघ वेळापत्रक (Lok Sabha Election 2024)
– उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात – १२ एप्रिल
– उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत -१९ एप्रिल
– उमेदवारी अर्जांची छाननी – २० एप्रिल
– उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत – २२ एप्रिल
– मतदान – ७ मे
– मतमोजणी – ४ जून

मतदारांची संख्या
विधानसभा मतदारसंघाचे नाव – मतदारांची संख्या
दौंड-  २,९९,२६०
इंदापूर –  ३,१८,९२४
बारामती – ३,६४,०४०
पुरंदर – ४,१४,६९०
भोर- ३,९७,८४५
खडकवासला – ५,२१,२०९
एकूण – २३,१५,९६८

पुणे, शिरूर, मावळ लोकसभा मतदारसंघ वेळापत्रक
– उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात – १८ एप्रिल
– उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – २५ एप्रिल
– उमेदवारी अर्जांची छाननी – २६ एप्रिल
– उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत – २९ एप्रिल
– मतदान – १३ मे
– मतमोजणी – ४ जून

पुणे मतदार संख्या
वडगावशेरी – ४५२६२८
शिवाजीनगर – २७२७९८
कोथरूड – ४०१४१९
पर्वती – ३३४१३६
पुणे कॅन्टोमेन्ट- २६९५८८
कसबा पेठ – २७२७४७
एकूण मतदार संख्या – २०,०३,३१६

शिरूर मतदारांची संख्या
विधानसभा मतदारसंघाचे नाव – मतदारांची संख्या
जुन्नर -३,०८,४३९

आंबेगाव – २,९८,५९८
खेड- ३,४५,०३५
शिरूर- ४,२९,८१८
भोसरी- ५,३५,६६६
हडपसर-५,६२,१८६
एकूण – २४,७९,७४२

मावळ मतदारांची संख्या
विधानसभा मतदारसंघाचे नाव – मतदारांची संख्या
मावळ- ३,६७,७७९
चिंचवड- ५,९५,४०८
पिंपरी- ३,६४,८०६
पनवेल (जि. रायगड)- ५,६३,९१५
कर्जत (जि. रायगड)- ३,०४,५२३
उरण (जि. रायगड)- ३.०९,२७५
एकूण – २५,०९,४६१

पुणे जिल्ह्यातील एकूण मतदार
– पुणे जिल्ह्यातील चारही मतदार संघातील एकूण मतदार संख्या—- ८२ लाख, २४ हजार ४३३ (जानेवारीअखेर)
– पुरुष मतदारांची संख्या-४२ लाख, महिला मतदार संख्या -३९ लाख
– १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या- ३५ हजार २३२
– २० ते २९ वयोगटातील मतदारसंख्या–१३ लाख ४२ हजार
– ८५ वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या मतदारांची संख्या–१ लाख २४ हजार२८९
– शंभर पेक्षा अधिक वयोमान असलेल्या मतदारांची संख्या —५ हजार ५१७
– एकूण मतदान केंद्रांची संख्या- ८ हजार ३८२
– निवडणुकीसाठी लागणारा कर्मचारी वर्ग- ७४ हजार
– मतदानासाठी लागणाऱ्या यंत्रांची संख्या- ४४ हजार
– पुणे-बारामतीची मतमोजणी- कोरेगाव येथील शासकीय गोदामात
– मावळ मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी स्टेडियम
– शिरूर मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव येथील गोदामात

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.