लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून राज्यात पहिल्या टप्प्यातील जागांवरील उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख संपली तरीही उबाठाचे नेते संजय राऊत हे आमची प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासोबत चर्चा सुरु आहे, असे म्हणत आहेत. त्यावर अखेर प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट शब्दांत संजय राऊत खोटे बोलत असल्याचे सांगितले. X वर केलेल्या पोस्टची सुरुवातच ‘संजय कितना झूठ बोलोगे?’ या वाक्याने केली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचे बरेचसे उमेदवार पडले होते, याही वेळी वंचितची धास्ती काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा गटाला आहे. मात्र दुसरीकडे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना महाआघाडीच्या जागा वाटपाच्या बैठकीत बोलवले जात नाही, तसेच आंबेडकरांच्या प्रस्तावावरही निर्णय घेत नाही, अशी स्थिती कायम आहे. असे असताना संजय राऊत मात्र त्यांच्या दररोजच्या वक्तव्यांमुळे वंचित महाविकास आघाडीबरोबर आहे कि नाही, याविषयी कायम संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे अखेर प्रकाश आंबेडकर यांनी X वर पोस्ट करून राऊतांच्या पर्दाफाश केला.
संजय, कितना झूठ बोलोगे!?
अगर आपके और हमारे विचार एक हैं तो हमें बुलाते क्यों नहीं हैं मीटिंग में?
6 मार्च की फोर सीजन्स होटल मैं हुई बैठक के बाद आपने हमारे किसी प्रतिनिधि को आमंत्रित क्यों नहीं किया?
आज भी आप वंचित को आमंत्रित किए बिना क्यों बैठक कर रहे है?
आपने तो सहयोगी… pic.twitter.com/EMbHh6VFME
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 28, 2024
(हेही वाचा Sanjay Raut : वंचितने उमेदवार जाहीर करणे हे संविधानाचे दुर्दैव; संजय राऊतांची खंत)
काय म्हणाले आंबेडकर?
प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) या दाव्यानंतर आता महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. संजय राऊत हे पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. “संजय, किती खोटं बोलणार! तुमची आणि माझी मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलावत नाही? फोर सीझन्स हॉटेलमध्ये 6 मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावले नाही? वंचितला आमंत्रण न देता आजही बैठक का घेत आहात? सहयोगी राहून तुम्ही पाठीवर वार केलेत! आम्हाला माहित आहे सिल्व्हर ओक येथील मीटिंगमध्ये तुम्ही काय भूमिका घेतली होती? काय हे खरे नाही कि तुम्ही अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, हे खरे नाही का? हे कसले नाते तुम्ही बनवत आहात. एकीकडे आघाडी असल्याचा भ्रम निर्माण करत आहात आणि दुसरीकडे आम्हाला पडण्याची रणनीती बनावत आहात. हे तुमचे विचार आहेत?, अशी टीका प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली.
Join Our WhatsApp Community