लोकसभा निवडणुकीतील चार टप्प्याचे मतदान झाले आहे. या चार टप्प्यात बंगलमधील १८ जागावर मतदान झाले आहे. मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पश्चिम बंगालकडे बघितलेसुद्धा नाही. अधीर रंजन चौधरी यांच्यावरील नाराजीमुळे त्यांनी प्रचाराकडे पाठ फिरविली असल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे. बंगालमध्ये चार टप्प्यात मतदान झाले आहे. मात्र आतापर्यंत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी निवडणूक प्रचारासाठी आलेले नाहीत. याबाबत प्रदेश काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे. अधीर रंजन चौधरी यांनीही याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे वगळता अजून एकही मोठा नेता बंगालमध्ये आलेला नाही. (Lok Sabha Election 2024)
काँग्रेस उमेदवारांच्या समर्थनार्थ राहुल गांधी आणि प्रियंका गांधी बंगालमध्ये न आल्याने पक्षाच्या राज्य युनिटच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे. त्यामुळे राज्यातील लढतीत काँग्रेस मागे पडू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले आहे. बंगालमधील १८ जागांवर चारही टप्प्यात मतदान झाले आहे. या काळात राहुल-प्रियांका एकदाही इथे आलेले नाहीत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे वगळता पक्षाचा अन्य कोणताही मोठा नेता अद्याप बंगालमध्ये आलेला नाही. राज्यात चार टप्प्यात काँग्रेसचे उमेदवार उभे राहिलेल्या बहुतांश जागांवर मतदान झाले आहे. यामध्ये बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्या बहरमपूर मतदारसंघाचा समावेश आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Ajit Pawar : बारामतीतील मतदानानंतर अजित पवार ‘नॉट रिचेबल’ ?; राष्ट्रवादी काँग्रेस काय म्हणते ?)
माझ्या प्रचारासाठी मला कोणाचीही गरज नाही
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी प्रचारासाठी बंगालमध्ये का आले नाही. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते म्हणून तरी त्यांनी आपल्या प्रचारासाठी यायला हवे होते? असा प्रश्न पत्रकारांनी अधीर रंजन चौधरी यांना विचारला. यावर चौधरी म्हणाले की, ‘माझ्या निवडणूक प्रचारासाठी कोणाचीही गरज नाही”. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींना बंगालमध्ये यायचे होते, पण त्याची गरज न जाणविल्यामुळे आपणच त्यांना न येण्यास सांगितले, असेही ते म्हणाले. (Lok Sabha Election 2024)
याचा राग अधीर यांना आहे का?
अधीर यांच्या बोलण्यामुळे राजकीय विश्लेषकही नाराजी व्यक्त करत आहेत. इंडी आघाडीचा भाग असलेल्या तृणमूल काँग्रेसवर हल्ला होऊ नये म्हणून बंगालमध्ये राहुल-प्रियांका यांच्या निवडणूक रॅलीचे आयोजन करण्यात आले नव्हते, अशी माहिती आहे. दुसरीकडे, बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जीही काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाबाबत मवाळ भूमिका घेत आहेत. (Lok Sabha Election 2024)
काँग्रेस हायकमांड बंगालमध्ये तृणमूलसोबत युती करण्याच्या बाजूने होते पण अधीर यांच्या तीव्र विरोधामुळे ते शक्य झाले नाही. काँग्रेसने काही जागांवर डाव्या आघाडीसोबत करार केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी बंगालमध्ये दोन जाहीर सभांना संबोधित केले. हायकमांडने आघाडीच्या करण्याच्या प्रस्तावला विरोध दर्शविल्यामुळे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी चौधरी यांच्यावर नाराज असल्याचेही समजते. याच कारणामुळे गांधी कुटुंबाने त्यांना वाऱ्यावर सोडले असल्याचीही चर्चा आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community