Lok Sabha Election 2024 : राहुल गांधींच्या ३० मिनिटांच्या भाषणात अर्धवेळ फक्त मीडियावरच टीका, लोकांकडून अनेक प्रश्न उपस्थित

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेशातील उना येथे जाहीर सभा घेतली.

185
महाराष्ट्र काँग्रेस हरियाणाच्या वाटेवर; Rahul Gandhi राज्यातील नेत्यांवर नाराज

लोकसभा निवडणुकीच्या ६ टप्प्यांतील मतदान आतापर्यंत पूर्ण झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेवळी राहुल गांधी हे मोदी, अदानी, अंबानी यांचा विषय काढून आपल्या भाषणाला सुरुवात करतात. विशेष म्हणजे त्यांच्या भाषणाचा शेवटही या नेत्यांच्या विषयानेच होतो, मात्र १ जून रोजी होणाऱ्या हिमाचल प्रदेशातील ४ जागांसाठी राहुल गांधी यांनी आपल्या बैठकीत जनतेबाबत बोलायचे सोडून १५ मिनिटे फक्त माध्यमांवरच टीका केली आहे.  (Lok Sabha Election 2024)

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेशातील उना येथे जाहीर सभा घेतली. देशातील प्रसारमाध्यमे मोदी, अदानी आणि अंबानी यांच्या भागीदारीत चालत आहेत. आजकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतींमध्ये मोदींचे चमचे विचारतात, मोदी जी, तुम्ही आंबा कसा खाता? चालता चालता खाता की सर्वकाही आपोआपच घडते? मुलाखतकर्त्याच्या या प्रश्नावर मोदी सांगतात की, हे सर्व आपोआप घडते. यावर मोदींचे चमचे वाह वाह… करतात. मोदींवर अशी टीका करत राहुल गांधी यांनी मोदींना प्रश्न विचारला की, मोदी हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांना सफरचंदांचे दर कमी मिळत असल्याच्या बातम्या माध्यमांनी दाखवल्या का? ३० मिनिटांच्या भाषणात राहुल गांधी अर्ध्या वेळेपर्यंत माध्यमांवर टीका करत होते. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – राजकोट अग्नितांडव प्रकरणात Gujarat High Court ची महत्त्वाची टिप्पणी!)

राहुल गांधी प्रचारापासून दूर
राहुल गांधींचा प्रचारातील सहभाग कमी होत चालला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ते जनतेशी कमी संवाद साधत आहेत आणि आपला राग जास्त व्यक्त करत आहेत. काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे की, निवडणूक प्रचारसभांमध्ये तरुण काँग्रेस नेते सचिन पायलट यांची मागणी जास्त आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.