लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी, (२० मे) मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. दरम्यान, मतदानाला सुरुवात होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत पोस्ट करत मतदारांना खास आवाहन केलं आहे.
लोकसभा २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ४९ जागांसाठी मतदान होत आहे, ज्या जागांसाठी मतदान होत आहे त्यासाठी सर्वांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, अशी पोस्ट पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
2024 लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात आज 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांसाठी मतदान होत आहे, ज्या जागांसाठी आज मतदान होत आहे त्यासाठी सर्वांना विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषत: महिला मतदारांना आणि तरुण मतदारांना मतदानाचा हक्क…
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2024
(हेही वाचा – T-20 World Cup: भारतीय संघात अंतिम ११मध्ये कुणाला संधी मिळणार? )
विशेषत: महिला मतदारांना आणि तरुण मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे मी आवाहन करतो, असं आवाहनदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ‘X’अकाउंटवरून केलं आहे. त्यामुळे मतदार मोदींच्या आवाहनाला काय प्रतिसाद देणार? याकडेही युझर्सचं लक्ष लागलं आहे.
हेही पहा –