लोकसभा निवडणुकीदरम्यान (Lok Sabha Election 2024) दारू, पैसा यासाठी अवैध मार्गाने वाहतूक होणार नाही, याची खबरदारी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेतली जात आहे. त्यासाठी सोलापूर जिल्ह्यात १२ ठिकाणी ग्रामीण पोलिसांचे चेकपोस्ट राज्य उत्पादन शुल्क विभागानेही तीन ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. त्याठिकाणी १६ मार्च ते ६ एप्रिल या २१ दिवसांत तब्बल ४० हजारांहून अधिक वाहने तपासण्यात आली आहेत.
लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, मतदारांना निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदारांना कोणीही प्रलोभने दाखवू नये, यासाठी जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, पोलीस आयुक्त एम. राज कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रत्येक अवैध तथा गैरप्रकारांवर लक्ष ठेवले जात आहे. नाकाबंदीच्या (चेकपोस्ट) ठिकाणी ट्रॅव्हल्स, टॅंकर, कंटेनर, दूध-भाजीपाल्याची वाहने, चारचाकी अशा वाहनांची तपासणी केली जात आहे.
व्हिडिओ शूटिंगमध्ये वाहनांची कशी सुरू आहे तपासणी ?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवर ग्रामीण पोलिसांचे १२ चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यापासून (१६ एप्रिल) त्याठिकाणी प्रत्येक संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. मागील २१ दिवसांत अंदाजे ३५ हजार वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान, त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून तेथील शूटिंग थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या कार्यालयात पाहता येते. दुसरीकडे महसूल व पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी त्याठिकाणी अचानक भेटी देऊन पाहणी करत आहेत. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक, प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चेकपोस्टवरील कामकाज नियोजनबद्ध सुरू असल्याची स्थिती आहे.
(हेही वाचा – K. K. Muhammed: मुस्लिमांनी काशी, मथुरा सोडावी – ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद )
२१ दिवसांत ४४.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बाहेरील राज्यातून किंवा जिल्ह्यातून सोलापूर शहर- जिल्ह्यात येणाऱ्या अवैध दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष आहे. त्यासाठी विशेष पथके नेमली असून नांदणी, वागदरी, मरवडे या ठिकाणी नाकाबंदी देखील आहे. १६ मार्च ते ६ मार्च या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध कारवायातून ४४ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती सोलापूरचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली आहे.
२१ दिवसांत ‘एवढा’ मु्द्देमाल जप्त…
– एकूण ४४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
– १३२ गुन्ह्यांमध्ये १०५ जणांना अटक, १७ वाहने जप्त
– साडेचार हजार हातभट्टी, ५२ हजार लिटर रसायन, सव्वातीनशे लिटर देशी-विदेशी दारू जप्त
– बियर, ताडी, गोव्याची दारू असा एकूण सहाशे लिटर मुद्देमाल हस्तगत
हेही पहा –