Lok Sabha Election 2024 : सपाने दिला काँग्रेसला धोका

बुधवारी (२१ फेब्रुवारी) समाजवादी पक्षाने लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आणि इंडी आघाडी तुटली की काय अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

217
Lok Sabha Election 2024 : ... तरीही काही राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रतिक्षेत

सध्या लोकसभा निवडणूकीची (Lok Sabha Election) चर्चा देशभरात सुरु आहे. भाजप पुन्हा मोदी येणार म्हणून आश्वस्त आहे. तर विरोधक इंडी आघाडीच्या (I.N.D.I. Alliance) माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्या समोर मोठं आव्हान निर्माण करता येईल म्हणून विश्वास व्यक्त करीत आहेत. मात्र बुधवारी (२१ फेब्रुवारी) समाजवादी पक्षाने लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आणि इंडी आघाडी (I.N.D.I. Alliance) तुटली की काय अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. (Lok Sabha Election 2024)

कारण उत्तर प्रदेशातील अमेठी, रायबरेली सह वाराणसी मधून काँग्रेस पक्षाला उमेदवार उभे करायचं होते. मात्र थेट वाराणसीमधून समाजवादी पक्षाने वाराणसीतून माजी मंत्री सुरेंद्र सिंह पटेल यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क व्यक्त केले जात आहे. शिवाय समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) काँग्रेसचा विश्वासघात केला असल्याचे सांगण्यात येत आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Maratha Reservation : आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक नको; २४ फेब्रुवारीपासून दररोज मराठा आरक्षणाचे आंदोलन)

सपाची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या (BJP) विरोधातातली इंडी आघाडी (I.N.D.I. Alliance) उत्तर प्रदेशनध्ये तुटली का असा प्रश्न निर्माण होत आहे. यापूर्वी आरएलडी हा पक्ष काँग्रेसपासून दुरावला आता समाजवादी पार्टीही काँग्रेसपासून दूर झाली का? अशी स्थिती दिसत आहे. कारण सपाने आज लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांची जागा असलेल्या वाराणसीसाठीही सपाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. समाजवादी पक्षाने (Samajwadi Party) वाराणसीतून माजी मंत्री सुरेंद्र सिंह पटेल यांना उमेदवारी दिली आहे. सुरेंद्र सिंह पटेल हे रोहनिया मतदारसंघातून आमदार आहेत. यापूर्वीही सपाने त्यांना लोकसभा मतदारसंघात उतरवले आहे. सपा आणि काँग्रेसची युती झाल्यास वाराणसीची जागा काँग्रेसकडे जाईल हे आधीच स्पष्ट झाले होते. अजय राय हेच पुन्हा काँग्रेसकडून मोदींविरोधात मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, याबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणतीही पुष्टी झाली नाही. (Lok Sabha Election 2024)

आता सपाची तिसरी यादी जाहीर झाली असून यात काँग्रेसच्या जागेवर सपाने उमेदवार घोषित केला आहे. सोमवारी (दि. १९) सपाने काँग्रेसला १७ जागांची ऑफर दिली होती. त्यांची ऑफर स्वीकारल्यानंतरच अखिलेश यादव रायबरेलीमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होतील, असे सांगण्यात आले. रायबरेलीतून यात्रा पार पडली आणि सपाची यादी आल्याने दोन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचे चित्र दिसत आहे. सपाने नुकतीच १७ लोकसभा जागांची यादी काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांना पाठवली होती. यामध्ये अमेठी, रायबरेलीसह वाराणसीचेही नाव होते. आता सपानेच (Samajwadi Party) वाराणसीतून उमेदवार दिला आहे. याशिवाय अमरोहाही या यादीत होते. आजच्या सपाच्या यादीतअमरोहामधूनही एक उमेदवार उभा केला आहे. याशिवाय कानपूर, फतेहपूर सिक्री, बसनगाव, सहारनपूर, प्रयागराज, महाराजगंज, झांसी, बुलंदशहर, गाझियाबाद, मथुरा, हाथरस, बाराबंकी आणि आणि देवरिया या १७ जागांचा समावेश होता. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.