Lok Sabha Election 2024: संजय निरुपम यांचा २० वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

धडाडीचे नेते म्हणून संजय निरुपम यांची ओळख आहे. त्यांना बाळासाहेबांनी दोन वेळा राज्यसभेवर पाठवलं.

125
Lok Sabha Election 2024: संजय निरुपम यांचा २० वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

संजय निरुपम यांची तब्बल २० वर्षांनंतर घरवापसी झाली आहे. शुक्रवारी, (३ मे) त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्ष प्रवेशावर जाहीर भूमिका मांडली होती. (Lok Sabha Election 2024)

शिवसेनेत केलेल्या पक्षप्रवेशाबाबत ते म्हणाले की, कॉंग्रेसमध्ये होतो यावेळी लोकसभा लढवायची होती, मात्र माझ्यासोबत दगाफटका केला गेला, मात्र आता २० वर्षांनंतर मी स्वगृही परतलो असून माझ्यासाठी हा सौभाग्याचा दिवस आहे. शिवसेनेत असताना पूर्वी अडचणी येत होत्या त्या आता येत नाहीत. आता एकनाथ शिंदे जो आदेश देतील तो पाळला जाईल आणि मुंबईतील शिवसेनेच्या तिन्ही जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा विश्वास संजय निरुपम यांनी दिला.

(हेही वाचा – Ratnagiri Sindhudurg Lok Sabha 2024 : कोकणी माणूस कोणाक करतलो आपलोसो)

धडाडीचे नेते म्हणून संजय निरुपम यांची ओळख आहे. त्यांना बाळासाहेबांनी दोन वेळा राज्यसभेवर पाठवलं. लोकसभेसाठी इच्छुक असतानादेखील एकदा बोलल्यानंतर पक्षाचं काम करण्यासाठी तयार झाले. यापुढे पक्षात त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असा विश्वास देत हा ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे, असे त्यांच्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.