Lok Sabha Election 2024: सत्तास्थापनेबाबत संजय राऊतांचे सूचक विधान, म्हणाले… 

262
Lok Sabha Election 2024: सत्तास्थापनेबाबत संजय राऊतांचे सूचक विधान, म्हणाले... 

अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर (Lok Sabha  Election 2024) ४ जून रोजी निकाल लागला. यंदाचा निकाल अनपेक्षित आणि सर्वच राजकीय विश्लेषक आणि एक्झिट पोल्सना धक्का देणारा ठरला. भाजपा (BJP) स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तविण्यात येत असतानाच प्रत्यक्षात मात्र भाजपाला २४० जागांवर समाधान मानावे लागले आहे. याचा अर्थ बहुमताचा २७२ हा आकडा गाठण्यासाठी आता त्यांना इतर सहयोगी पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने (Congress) देशभरात चांगली कामगिरी करत ४४ खासदारांच्या संख्येवरून थेट ९९ वर मजल मारली आहे. दरम्यान सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. एनडीएला (NDA) बहुमत मिळालं असलं तरीही इंडि आघाडीही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे. यावरून उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली आहे. इंडि आघाडीची बैठक संपल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election : उत्तर प्रदेशात भाजपाला जागा का कमी मिळाल्या? कॅप्टन रिझवी यांनी सांगितली कारणे..)

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, “आम्ही राष्ट्रपती भवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार आहोत”, असं संजय राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, मोदींना शपथ (PM Narendra Modi) घेऊद्या. पण नंतर खेळ सुरू होईल. हे सरकार चालणार नाही. आम्हाला तर वाटतं मोदींनी शपथ घ्यावी. ८ तारखेला नाही तर आज रात्रीच शपथ घ्यावी, त्यांच्यावतीने आम्ही पेढे वाटू.” असे विधान संजय राऊत यांनी केले. 

(हेही वाचा – अभिमानास्पद! अंतराळवीर Sunita Williams यांची तिसऱ्यांदा ‘अवकाशभरारी’)

दरम्यान, इंडि आघाडीकडूनही सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. परंतु, योग्य वेळ आल्यानंतर आम्ही योग्य ती पावलं उचलू असं मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) इंडि आघाडीच्या (India Alliance) बैठकीनंतर म्हणाले होते. त्यामुळे ही नेमकी योग्य वेळ कोणती याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. जनतेने मोदींविरोधात मतदान केल्याने जनतेच्या मनाप्रमाणे सरकार स्थापन केलं जाईल, असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. परंतु, बहुमतासाठी इंडि आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नाही. बहुमतासाठी त्यांनी समविचारी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. परंतु, एनडीएची साथ सोडून इंडिया आघाडीकडे हे जुने मित्र पक्ष येतील का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.