आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने (Congress) शनिवारी रात्री उशिरा (23 मार्च, 2024) राज्यातील दुसरी यादी (Lok Sabha Election 2024) जाहीर केली. काँग्रेसने आतापर्यंत 185 उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने जाहीर केलेल्या यादीत अनेक मोठ्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूरमधून केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे.
(हेही वाचा – Devendra Fadanvis : कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा देण्यावर काय म्हणाले फडणवीस?)
काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी : (Congress)
नागपूर- विकास ठाकरे
गडचिरोली- नामदेव किरसान
भंडारा-गोंदिया- प्रशांत पडोळे
रामटेक- रश्मी बर्वे (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांची अटकेविरोधात हायकोर्टात धाव, कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा)
काँग्रेसची पहिली यादी (Congress)
१. नंदुरबार- गोवाल पाडवी
२. अमरावती- बळवंत वानखेडे
३. नांदेड- वसंतराव चव्हाण
४. पुणे- रवींद्र धंगेकर
५. लातूर- डॉ. शिवाजीराव कळगे
६. सोलापूर- प्रणिती शिंदे
७. कोल्हापूर- शाहू महाराज छत्रपती (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: ठाकरे गटाचे नेते निवडणुकीत मदत करतील, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा दावा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध अजय राय :
काँग्रेसने (Congress) शनिवारी रात्री देशभरातील ४६ उमेदवारांची (Lok Sabha Election 2024) यादी जाहीर केली आहे. यामध्ये नाना पटोले यांचं नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मध्य प्रदेशात राजगडमधून दिग्विजय सिंह, भोपाळमधून अरुण श्रीवास्तव आणि रतलाममधून कांतिलाल भूरिया निवडणूक लढवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अजय राय वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अमरोहाचे विद्यमान खासदार दानिश अली, ज्यांनी बसप सोडली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यांना त्यांच्या जागेवरून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Muslim : शौचालयात हिंदू विद्यार्थ्याचा व्हिडिओ बनवल्याप्रकरणी 3 मुस्लिम मुलींवर आरोपपत्र दाखल)
नागौरची जागा हनुमान बेनीवालसाठी सोडली :
याशिवाय काँग्रेसने (Congress) बस्तरमधून विद्यमान खासदार दीपक बैज यांना तिकीट नाकारून कवासी लखमा यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. हरीश रावत यांचे पुत्र विरेंद्र रावत हरिद्वारमधून तर प्रकाश जोशी नैनीतालमधून निवडणूक लढवत आहेत. राजस्थानमधील नागौरची जागा हनुमान बेनीवालसाठी सोडली आहे. काँग्रेसने सीकरची जागा आधीच सीपीआय (एम) साठी सोडली आहे शिवगंगामधून कार्ती चिदंबरम आणि विरुधुनगरमधून माणिकम टागोर यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community