आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. या उमेदवार यादीमध्ये एकूण ११ जणांचा समावेश आहे. वंचितच्या पहिल्या यादीप्रमाणेच दुसऱ्या यादीतही समाजातील सर्व जाती-घटकांना स्थान मिळेल, याची काळजी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे वंचितच्या दुसऱ्या यादीतही लोकसभा उमेदवारांच्या (Lok Sabha Election 2024) नावापुढे त्यांची जात नमूद करण्यात आली आहे.
वंचितच्या पहिल्या लोकसभा उमेदवार यादीत ८ जणांचा समावेश होता, तर दुसऱ्या उमेदवार यादीत ११ जणांचा समावेश आहे. त्यामुळे वंचितने आतापर्यंत लोकसभेचे १९ उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीसोबत युतीची बोलणी सुरू असताना प्रकाश आंबडेकर यांनी लोकसभेच्या २७ मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीकडे विजय मिळवण्याइतकी ताकद असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आतापर्यंत वंचितने १९ लोकसभा उमेदवार जाहीर केले आहेत.
(हेही वाचा –Cricketer Kedar Jadhav : क्रिकेटपटू केदार जाधव राजकारणाचे पीच आजमावणार ?; घेतली फडणवीसांची भेट )
दुसऱ्या यादीतील लोकसभेचे उमेदवार कोण?
– हिंगोली – डॉ. बी. डी. चव्हाण
– लातूर – नरिसिंहराव उदगीरकर
– सोलापूर – राहुल काशिनाथ गायकवाड
– माढा – रमेश नागनाथ बारसकर
– सातारा – मारुती धोंडीराम जानकर
– धुळे – अब्दुर रहमान
– हातकलंगणे – दादासाहेब पाटील
– रावेर – संजय पंडित ब्राह्मणे
– जालना – प्रभाकर देवमन बकले
– मुंबई उत्तर मध्य – अबु हसन खान
– रत्नागिरी-सिंधुदुर्ग – काका जोशी
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its second list of candidates from Maharashtra for the Lok Sabha elections. pic.twitter.com/9TFe472Byw
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) March 31, 2024
“>
Join Our WhatsApp Community