राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरुवारी दुसरी यादी जाहीर केली असून भिवंडीतून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत राजाराम पाटील यांनी ३० मार्च रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये अमर काळे वर्धा, सुप्रिया सुळे बारामती, भास्कर भगरे दिंडोरी, अमोल कोल्हे शिरूर, आणि निलेश लंके यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. (Lok Sabha Election 2024)
बीड जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघात यापूर्वी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. समाजवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून हा जिल्हा शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर या जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर यांचा अपवाद वगळता बहुतांश लोकप्रतिनिधी अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Nana Patole : अजूनही वेळ गेलेली नाही; नाना पटोलेंचे प्रकाश आंबेडकरांना खुले आव्हान)
बाळ्यामामा म्हात्रेंची लढत कपिल पाटील यांच्या विरोधात
भाजपाने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातून पवार कोणाला उमेदवारी देतील याकडे लक्ष लागले होते. शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. मागील आठवड्यात मेटे यांनी शरद पवार आणि या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दोन वेळा भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे या चर्चेला आणखी बळ मिळाले होते. (Lok Sabha Election 2024)
२०१९ मध्ये भाजपाच्या बीड लोकसभा उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना लक्षवेधी मतदान झाले होती. मात्र ज्योती मेटे यांची बाजू भक्कम असल्याची चर्चा झाल्यामुळे सोनावणे यांचे नाव मागे पडले होते. मात्र, गुरुवारी जयंत पाटील यांनी सोनावणे यांचे नाव जाहीर करून मेटे आणि बीडकरांनाही धक्का दिला आहे. भिवंडीमध्ये बाळ्यामामा म्हात्रे यांची लढत भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात होईल. पाटील हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. म्हात्रे आणि पाटील हे दोन्हीही तुल्यबळ उमेदवार असल्यामुळे येथील सामना लक्षवेधी ठरणार आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community