Lok Sabha Election 2024 : निर्भया केस लढणाऱ्या सीमा कुशवाह भाजपामध्ये दाखल

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सीमा कुशवाह पक्षात स्वागत केले. कुशवाह या निर्भया सामूहिक बलात्कार, हाथरस सामूहिक बलात्कार आणि श्रद्धा वालकर हत्या यासारख्या ऐतिहासिक घटनांमध्ये पीडितांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

186
Lok Sabha Election 2024 : निर्भया केस लढणाऱ्या सीमा कुशवाह भाजपामध्ये दाखल
Lok Sabha Election 2024 : निर्भया केस लढणाऱ्या सीमा कुशवाह भाजपामध्ये दाखल
राजधानी मधील खळबळजनक निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील (Nirbhaya case) निर्भयाला न्याय मिळवून देणाऱ्या वकील सीमा कुशवाह (seeema kushvah) यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.भाजपा (Bjp) मुख्यालयात ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थिती मध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला.
यावेळी भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे आणि उत्तर प्रदेशचे भाजपा (Bjp) नेते ब्रिजेश पाठक यांनी त्यांचे भाजपा मध्ये स्वागत केले. (Lok Sabha Election 2024)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या 2024 (Lok Sabha Election 2024) च्या तारखांची घोषणा होऊनही विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये पक्ष बदलण्याचा टप्पा सुरूच आहे. बहुजन समाज पक्षाच्या लालगंजच्या खासदार संगीता आझाद यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या वकील आणि बसपा नेत्या सीमा कुशवाह (seeema kushvah) यांनीही सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. कुशवाह या निर्भया सामूहिक बलात्कार, हाथरस सामूहिक बलात्कार आणि श्रद्धा वालकर हत्या यासारख्या ऐतिहासिक घटनांमध्ये पीडितांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. (Lok Sabha Election 2024)
बसपाचा राजीनामा 
कुशवाह यांनी जानेवारी 2022 मध्ये मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्ष  मध्ये प्रवेश केला होता. निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या आईचे प्रतिनिधित्व केल्यानंतर कुशवाह प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी निर्भया ज्योती ट्रस्टची स्थापना केली आणि बलात्कार पीडितांच्या बाजूने न्यायासाठी वकिली करण्याची मोहीम सुरू केली. (Lok Sabha Election 2024)
निर्भया प्रकरणात त्यांनी न्याया साठी प्रदीर्घ लढा दिला होता.त्यामुळे चार आरोपीना दोषी ठरवण्यात आले होते.तसेच 20 मार्च 2020 रोजी त्यांना दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.