लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) ख्रिस्ती समुदायाची मते मिळावीत, म्हणून त्यांना खुश करण्यासाठी शरद पवार आणि त्यांची मुलगी बारामती लोकसभा निवडणुकीतील उमेदवार सुप्रिया सुळे हे दोघेही चर्चमध्ये गेले, त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात जोरदार व्हायरल होत आहे.
निवडणूक आली की शरद पवार मतांची बेगमी करण्यासाठी समाजातील विशेषतः अल्पसंख्याक समुदायाला खुश करण्याचा प्रयत्न करतात. असा त्यांचा परिचय आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. शरद पवारांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह त्यांच्या हातून निघालेले आहे, पक्षाचे नेतृत्व अजित पवारांकडे आले आहे. त्यामुळे शरद पवारांसाठी ही लोकसभा निवडणूक आव्हानाची आहे. त्यातच त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांनाही यंदा पवार कुटुंबातूनच आव्हान मिळाले आहे. त्यामुळे शरद पवारांची आता धडपड सुरु झाली आहे.
(हेही वाचा Bengaluru Blast: बेंगळुरू बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएची कारवाई, पश्चिम बंगालमधून आरोपी आणि सूत्रधाराला अटक)
शरद पवार-सुप्रिया सुळे यांच्याकडून येशूची प्रार्थना
त्यामुळेच शरद पवार या निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) प्रचारात ख्रिस्ती समुदायाला आकर्षित करण्यासाठी चर्चमध्ये गेले. तिथे त्यांनी मुलगी सुप्रिया सुळे हिच्यासह त्यांनी येशूची प्रार्थना केली. या त्यांच्या चर्चमधील प्रार्थनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. एरव्ही मी नास्तिक आहे, मी देवाला मानत नाही सांगत हिंदू देवतांची अहवेलना करणारे शरद पवार यांनी खिस्त्यांच्या मतांसाठी चर्चमध्ये जाऊन येशूची प्रार्थना केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेही सुखावलेल्या चेहऱ्याने चर्चमधील पाद्र्याचे आभार मनात असल्याचे दिसत आहेत.