शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांना ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळणार की भाजपाकडून संजीव नाईक अशी चर्चा सध्या रंगली आहे. कारण ठाण्याच्या जागेचा तिढा कायम असताना प्रताप सरनाईक यांचे एक पत्र व्हायरल झाले आहे, ज्यात प्रताप सरनाईक लोकसभा लढवणार असल्याचं स्वतः सरनाईक यांनी म्हटलं आहे. एकीकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि ठाण्याच्या जागेवर उमेदवाराची घोषणा झालेली नाही. ठाण्याच्या जागेसाठी शिवसेनेकडून रविंद्र फाटकांच्या नावाबाबत शिंदे स्वत: आग्रही होते. मात्र, सर्वसामान्य नाव म्हणून सरनाईकांच्या नावाचाही अंतिम निर्णय होऊ शकतो. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – IPL 2024, Punjab Kings : पंजाब किंग्ज संघाचा उपकर्णधार नेमका कोण? जितेश शर्मा की सॅम करन?)
ठाणे लोकसभा मतदारसंघ युतीत कुणाच्या पारड्यात पडणार?
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आग्रही आहेत. ठाणे मतदारसंघ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. याच मतदारसंघातून शिंदे गटाचे प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश मस्के आणि माजी विधानपरिषदेचे रवींद्र फाटक यांच्या नावांची चर्चा आहे. सोबतच भाजपा नेत्यांनी या जागेवर दावा केला असून, भाजपाचे काही वरिष्ठ नेतेसुद्धा यासाठी प्रचंड आग्रही असल्याची चर्चा आहे. तर, भाजपाकडून डॉ. संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ युतीत कुणाच्या पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. (Lok Sabha Election 2024)
खासदार राजन विचारे यांनी पाच वर्षांसाठी राष्ट्रवादीकडं गेलेला मतदारसंघ २०१४ मध्ये पुन्हा खेचून आणला होता. त्यानंतर सलग दोन वेळा ते खासदार आहेत. बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहाणाऱ्या काही मोजक्या नेत्यांमध्ये विचारे यांचा समावेश होता. ठाकरे गटासाठी या मतदारसंघातली निवडणूक अस्तित्वाची लढाई असल्यासारखी आहे. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळणार यामध्ये काहीही शंका नव्हती. पण आता ठाकरे गटाच्या राजन विचारे यांच्या विरोधात कोण असणार? हा सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे. (Lok Sabha Election 2024)
भाजपाने या मतदारसंघाची मागणी लावून धरण्यामागचं कारण म्हणजे, मतदारसंघातील ६ पैकी चार विधानसभा मतदारसंघात त्यांचे आमदार आहेत. त्यामुळं मतदारसंघामध्ये आपली शक्ती जास्त असल्याचं कारण भाजप देत आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे याच ठाणे लोकसभा मतदारसंघातील आहेत. परंतु ठाण्यावरून भाजपा व शिवसेना शिंदे गटात घोडे अडले असून शिवसेना शिंदे गटाची प्रतिष्ठा ठाणे लोकसभा मतदार संघावरून लागली आहे. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला की भाजपाच्या वाट्याला येणार हेच अजून निश्चित नाही. (Lok Sabha Election 2024)
आमदार प्रताप सरनाईक हे लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्यास इच्छुक नसल्याने मविआचे राजन विचारे यांच्या समोर तगडा उमेदवार देण्यासाठी संजीव नाईक यांच्या शिवाय दुसरा पर्याय नसल्याने नाईक हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकतात. त्यातच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन राजन विचारे हे दोन वेळा खासदार म्हणून प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत. यंदा शिवसेना ठाकरे गटाचे चिन्ह मशाल आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार धनुष्यबाण चिन्हावरून लढल्यास त्याचा फायदा देखील नाईक यांना होणार अशी अटकळ असू शकते. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community