देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचे वारे आता वाहू लागले आहेत. त्यासाठी प्रचाराची रणधुमाळी देखील सुरू झाली आहे. यातच ठाकरे यांचे निवासस्थान असलेले मातोश्री ज्या लोकसभा मतदारसंघात येते ते उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी काँग्रेसला सुटलेला असल्याने या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार पंजाच्या चिन्हावर असणार आहे. (Lok Sabha Election 2024)
त्यामुळेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबाला दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करावे लागेल का ? ते पंजावर मतदान करणार असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. याच कारण म्हणजे इंडी आघाडीत झालेल्या जागावाटपामुळे उद्धव ठाकरे दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार आहेत. सध्या उत्तर मध्य मुंबईत उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब राहत आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये ही जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. यामुळे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान करणार आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Mulund Toll Naka : मुलुंडच्या हरी ओम नगर रहिवाशांसाठी संपूर्ण टोल माफी; कोटेचा काय म्हणतात…)
यंदा महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना बऱ्याच मतदारसंघांमध्ये पहावयास मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार की इंडी आघाडी भाजपाला धक्का देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community