Lok Sabha Election 2024: यूपीत सपा – काँग्रेसमध्ये समझोता

186
Lok Sabha Election 2024: यूपीत सपा - काँग्रेसमध्ये समझोता
Lok Sabha Election 2024: यूपीत सपा - काँग्रेसमध्ये समझोता

वंदना बर्वे

लोकसभेच्या निवडणुकीसाठी(Lok Sabha Election 2024) उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस(Congress) यांच्यात आघाडी झाली आहे. जागा वाटपाच्या मुद्यावरून दोन्ही पक्षात समझोता झाला असून सपाने कॉग्रेससाठी(Congress) 17 जागा सोडल्या आहेत. उर्वरित जागा सपाकडून लढविल्या जातील. इंडी आघाडीत आणखी एखादा मित्र पक्ष जोडला गेला तर त्या पक्षाला सपा आपल्या कोट्यातून जागा देणार आहे.(Lok Sabha Election 2024)
काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे(Avinash Pandey) आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजय राय(Ajay Rai) यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.(Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Baramati च्या निमित्ताने Pawar कुटुंबाची कटुता चव्हाट्यावर येणार? )

कॉग्रेस नेत्या प्रियंका गांधी(Priyanka Gandhi) यांनी मध्यस्थी केल्यामुळे यूपीत काँग्रेस(Congress) आणि समाजवादी पक्षाची आघाडी झाली असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. प्रियंका गांधी यांनी अखिलेश यादव यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि दोन्ही पक्षांतील वाद संपुष्टात आला. मुरादाबाद येथे आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असे सूत्राचे म्हणणे आहे.(Lok Sabha Election 2024)

यूपीनंतर मध्यप्रदेशातही आघाडी
उत्तरप्रदेशानंतर मध्यप्रदेशातही कॉग्रेस(Congress) आणि सपा आघाडी करून निवडणुकीला(Lok Sabha Election 2024) सामोरे जाणार आहे. मध्य प्रदेशातील 29 पैकी 28 जागांवर काँग्रेस लढणार आहे. तर एक जागा सपासाठी सोडण्यात आली आहे. काँग्रेसने खजुराहो लोकसभा(Lok Sabha Election 2024) सीट सपाला देण्याची घोषणा केली. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान सपा आणि काँग्रेसमध्ये युती होऊ शकली नव्हती. यामुळे समाजवादी पक्ष नाराज होता, हे येथे उल्लेखनीय.(Lok Sabha Election 2024)

उत्तराखंडसाठी कॉग्रेस—सपात चर्चा
यूपी आणि मध्यप्रदेशात समझोता झाल्यानंतर कॉग्रेस(Congress) आणि सपा उत्तराखंडमध्ये सुध्दा आघाडी करू शकते अशी चर्चा रंगली आहे. उत्तराखंडमध्ये लोकसभेच्या पाच जागा आहेत. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.