लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) इंडि आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर आता नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे तिसऱ्यांदा ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर शुक्रवारी राजधानी दिल्लीत संसदीय दलाची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली, आणि त्यात सर्वांनी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव मंजूर केला. दरम्यान केंद्र सरकारच्या सत्ता स्थापनेत महाराष्ट्राला मोठा वाटा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Powai Bheemnagar : पवई दगडफेक प्रकरण; ६ महिलांसह ५७ जणांना अटक)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळातील समावेशाबरोबरच देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यावरही चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दोन तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर राज्यातील नेत्यांची दिल्लीमध्ये खलबते सुरू आहेत.
(हेही वाचा – Hindu Janjagruti Samiti : दारू दुकाने व ‘बार’ला देवता-राष्ट्रपुरुषांची नावे; अधिकार्यांवर कारवाईची मागणी)
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महायुतीला अपयशाचा सामना करावा लागला. मागील निवडणुकीत महाराष्ट्रात ४१ जागा जिंकणाऱ्या महायुतीला यंदा मात्र अवघ्या १७ जागांवर समाधान मानावं लागलं. तर दुसरीकडे, विरोधकांच्या महाविकास आघाडीने तब्बल ३० जागांवर विजय मिळवला. (Lok Sabha Election 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community