नाशिक लोकसभा मतदार संघात ठाकरे गटातून बंडखोरी करत विजय किसन करंजकर (अपक्ष) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस असतांना ठाकरे गटात बंडखोरी झाली असून करंजकर हे आपली उमेदवारी कायम ठेवतात की उमेदवारी अर्ज मागे घेता हे माघारीच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली असल्याचे चित्र आहे. (Lok Sabha Election 2024)
दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघात अगोदर महायुतीचा उमेदवार ठरवण्यावरुन संघर्ष सुरू होता. त्यानंतर आता यामध्ये आणखीन भर पडली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यात निवडणूका होणार आहेत. २० मे रोजी नाशिकमध्ये मतदान पार पडणार आहे. आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. अशातच ठाकरे गटाची दुखी आणखी वाढली आहे.
(हेही वाचा –IPL 2024, Rohit on Captaincy : ‘सगळंच काही तुम्हाला मिळत नाही,’ असं रोहित शर्मा का म्हणतो? )
२०१९ला करंजकर इच्छुक होते. हे गेल्या लोकसभा निवडणुकीला सुध्दा इच्छुक होते. पण, त्यावेळेस हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली. यावेळेस गोडसे हे शिवसेना शिंदे गटात गेल्यामुळे करंजकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. त्यांनी मतदारांशी संपर्कसुद्धा सुरू केला होता. पण, त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन २ दिवसांत निर्णय…
शुक्रवारी, (३ मे) अर्ज दाखल केला असून २ दिवसांत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा मेळावा घेऊन पुढील निर्णय घेऊ. मातोश्रीने भेटीसाठी ३ वेळा बोलावले; पण जायच्या आदल्या दिवशी कॉल करून आज येऊ नको, असे सांगण्यात आल्याचे करंजकर म्हणाले. ३५ नगरसेवक आणि ४ जिल्हा परिषद सदस्य सोबत असल्याचा दावा करंजकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट झाली. खूप पूर्वीपासून दोघांसोबत कामं करतोय त्यामुळे चांगली ओळख असून ती कायम राहिलं असेही करंजकर म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community