Lok Sabha Election 2024 : एसटी बस प्रवाशांसाठी की निवडणूक कामांसाठी ?

निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात एसटी बसेसचा वापर होत असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेली एसटी मात्र सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे मात्र हाल होताना दिसत आहेत.

143
Maharashtra Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांचे सप्टेंबरमध्ये वाजणार बिगुल ?

मतदान आपला हक्क आहे, तो बजावलाच पाहिजे. मात्र, त्याच मतदारांची शासनाकडून पिळवणूक होत असल्याचे प्रकार राज्यभरात घडत आहेत. शासनाने निवडणूक कामांसाठी तसेच निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी एसटी महामंडळाकडून तब्बल ९ हजार बसेस घेतल्या आहेत. शासकीय कामासाठी शासकीय बसेस वापरणे योग्यच. मात्र, योग्यरीत्या नियोजन केले नसल्याने सामान्य प्रवाशांच्या वाट्याला केवळ ४५०० बसेस राहिल्या आहेत. परिणामी, मतदानासाठी अथवा दैनंदिन वाहतूक करताना बसेस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. (Lok Sabha Election 2024)

सर्वसामान्यपणे मे महिना म्हणजे सुट्ट्यांचा मौसम असतो. विद्यार्थ्यांना शाळेला सुट्ट्या असल्याने पालक देखील मोठ्या प्रमाणात गावाकडे जातात. तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ग्रामीण भागात एसटी हेच एक हक्काचे प्रवासाचे साधन मानलं जातं. त्यातच निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात एसटी बसेसचा वापर होत असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेली एसटी मात्र सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे मात्र हाल होताना दिसत आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Sam Pitroda, तुम्हाला भारत कळलाच नाही!)

शासनाने एसटी बसेस उपलब्ध करत प्रवाशांची गैरसोय थांबवावी

निवडणूक काळ असला तरी दुसऱ्या बाजूला उन्हाळी हंगाम सुरू आहे. परंतु आज निवडणूक कामासाठी सर्वाधिक बसेस वापरत असल्याने सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रवाशांच्या तुलनेने १८ हजार बसेसची सध्या आवश्यकता असताना एसटीच्या ताफ्यात केवळ १५ हजार ६०० बसेस आहेत. त्यापैकी काही जुन्या आणि नादुरुस्त बसेस असल्याने केवळ १३ हजार बसेस रस्त्यावर धावत आहेत. शासनाने एसटी बसेस उपलब्ध करत प्रवाशांची गैरसोय थांबवावी. अशी मागणी श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस यांनी केली आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.