Lok Sabha Election 2024 : सातारा माढ्याच्या जागेचा तिढा सुटणार ?

मागील काही दिवसांपासून सातारा लोकसभा मतदारसंघात दस्तूर खुद्द शरद पवार यांनी बैठका घेऊन चाचपणी केली. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडे ही लोकसभा असल्याने या ठिकाणी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी न लढवण्याच्या भूमिकेमुळे साताऱ्यात शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

208
Lok Sabha Election 2024 : माढ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिलेले असताना देखील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात फक्त महायुतीकडून रणजित सिंह निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून दोन्ही मतदारसंघांमध्ये अजूनही उमेदवार देण्यात आलेला नाही. दुसरीकडे सातारा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून अजूनही उदयनराजे भोसले यांची उमेदवारी देखील जाहीर झालेली नाही. त्यामुळेच सातारा आणि माढा या दोन महत्त्वपूर्ण लोकसभा मतदारसंघांमध्ये शरद पवार कोणती खेळी खेळणार हे पाहणं औत्सुक्याचे झालं आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Sudhir Mungantiwar : मतदान देशीसाठी नाही तर देशासाठी करा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन)

शरद पवार कोणाला देणार संधी…

मागील काही दिवसांपासून सातारा लोकसभा मतदारसंघात दस्तूर खुद्द शरद पवार यांनी बैठका घेऊन चाचपणी केली. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडे ही लोकसभा असल्याने या ठिकाणी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारी न लढवण्याच्या भूमिकेमुळे साताऱ्यात शरद पवार कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या ठिकाणी शशिकांत शिंदे यांची या ठिकाणची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली असली तरी श्रीनिवास पाटील यांनी आपल्या मुलासाठी देखील आग्रह धरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे यांना संधी दिली जाणार की श्रीनिवास पाटील यांच्या पारड्यामध्ये मत टाकलं जाणार ? याच लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उमेदवारी लढवावी अशी गळ शरद पवार गटाकडून घालण्यात आली होती परंतु तुतारी या चिन्हावरती लढण्याचा प्रश्नच येत नाही असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी या सर्व गोष्टींवर पडदा टाकला आहे. (Lok Sabha Election 2024)

तर दुसरीकडे भाजपाच्या वतीने उदयनराजे भोसले यांना जरी उमेदवारी जाहीर झाली नसली तरी त्यांनी संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये लोकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असून ते आपल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. माढामध्ये रणजित निंबाळकर यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असली, तरी त्यांच्या विरोधामध्ये प्रचंड वातावरण आहे. त्यामुळे भाजपाचेच धैर्यशील पाटील तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का ? याकडे देखील संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत महाविकास आघाडीची महत्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित केली असून या पत्रकार परिषदेत या दोन्ही मतदारसंघाच्या उमेदवारांची घोषणा होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.