Lok Sabha Election 2024 : बोरिवली गोराईतील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यास सर्वोच्च प्राधान्य – पीयूष गोयल

179
Lok Sabha Election 2024 : बोरिवली गोराईतील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यास सर्वोच्च प्राधान्य - पीयूष गोयल

बोरीवलीतील गोराईसह उत्तर मुंबईतील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यास माझे सर्वोच्च प्राधान्य असेल. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या गॅरंटीनुसार झोपड्यांचा पुनर्विकास करून रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन उत्तर मुंबईतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी दिले. जन आशीर्वाद रथातून नागरिकांशी संपर्क साधतानाच गल्लीबोळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी पीयूष गोयल यांनी गुरुवारी (२ मे) आमदार सुनील राणे यांच्यामागे स्कूटरवर बसून प्रचार फेरी काढत बोरीवलीकरांची मने जिंकली. (Lok Sabha Election 2024)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राबवलेल्या अनेकविध योजनांमुळे जीवनमान किती बदलले आणि जनसामान्यांना किती दिलासा मिळाला हे त्यांनी सविस्तर मांडले. गेल्या काही वर्षांत बोरीवलीचा कसा कायापालट झाला हे सांगून येत्या काही दिवसांत कायाकल्प होणार असल्याने पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांना मतांच्या रूपाने भरभरून आशीर्वाद देण्याचे आवाहन पीयूष गोयल यांनी नागरिकांना केले. बोरीवली (पश्चिम) येथील सिंधुदुर्ग भवन, सेक्टर ६, आरपीडी ७ ते गोराई येथील पेप्सी मैदान या मार्गावर या भव्य प्रचार फेरीचे आयोजन केले होते. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – चंद्रहार पाटील यांची उमेदवारी आम्हाला टीव्हीवरच समजली; Sharad Pawar यांचा गौप्यस्फोट)

जन आशीर्वाद प्रचार रथातून केलेल्या या प्रचाराला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. प्रचार फेरी मार्गावरील इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी रथाजवळ येऊन त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले आणि त्यांना आपला पाठिंबाही दर्शवला. काही निवासी भागात प्रचार रथ जाऊ शकणार नाही हे लक्षात येताच पीयूष गोयल (Piyush Goyal) हे बोरीवली मतदासंघांचे आमदार सुनील राणे यांच्यामागे स्कूटरवर बसले आणि त्यांनी वस्तीवस्तीत फिरून नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. या प्रचारफेरीत बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार, मनसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.