लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार स्तरावर अथवा पक्षीय स्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी सुविधा पोर्टल suvidha.eci.gov.inचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. (Lok Sabha Election 2024)
माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण, मतदार जनजागृती स्वीप, मनुष्यबळ, वाहने, टपाली मतपत्रिका, आचारसंहिता, ईव्हीएम मशीन, मतदान केंद्र नियोजन, कायदा व सुव्यवस्था, निरीक्षकांची व्यवस्था, स्ट्राँग रूम व्यवस्था, दिव्यांग मतदार सुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी शिनगारे वेळोवेळी आढावा घेत असून संबंधित नोडल अधिकाऱ्यांकडून केलेल्या कार्यवाहीची ते नियमितपणे माहिती घेत आहेत. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Chandrasekhar Bawankule: “उद्धव ठाकरे पिसाळले…”, फडणवीसांवर केलेल्या टीकेला बावनकुळेंचा पलटवार)
‘सुविधा पोर्टला’चा उपयोग…
उमेदवारास वैयक्तिक स्तरावर अथवा पक्षीय स्तरावर प्रचारासाठी आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसाठी भारत निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा’ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून परवानगी घेता येते. निवडणुकीसंबंधी कोणत्याही विषयात आचारसंहितेचे तंतोतंत पालन होईल, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी. संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण क्षमतेने पूर्ण कराव्यात, असेही जिल्हाधिकारी शिनगारे (Lok Sabha Election 2024) यांनी संबंधित नोडल अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community