Lok Sabha Election 2024 : वंचित आघाडी ४८ जागा लढवणार?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या झालेल्या इंडी (Indi Alliance) आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला (VBA) स्थान देण्यास राज्यातील काँग्रेस नेत्यांनी विरोध केल्याचे आता उघड झाले आहे.

290
Lok Sabha Election 2024 : वंचित आघाडी ४८ जागा लढवणार?
Lok Sabha Election 2024 : वंचित आघाडी ४८ जागा लढवणार?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या झालेल्या इंडी (Indi Alliance) आघाडीत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीला (VBA) स्थान देण्यास राज्यातील काँग्रेस (Congress) नेत्यांनी विरोध केल्याचे आता उघड झाले आहे. काँग्रेसकडून (Congress) वंचितला इंडी आघाडीपासून (Indi Alliance) दूर ठेवण्याचा प्रयत्न झाल्यास वंचित २०१९ प्रमाणे आपली वेगळी चूल मांडून काँग्रेसला (Congress) पुन्हा झटका देण्याच्या तयारीत आहे. तर याचा फटका उबाठालाही बसणार असल्याचे संकेत वंचितकडून देण्यात आले.

काँग्रेसचा आंबेडकरांवर विश्वास नाही

वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) काँग्रेससोबत जुळवून घेत इंडी आघाडीत (Indi Alliance) स्थान मिळवण्यासाठी धडपड केली मात्र राज्यातील नेत्यांनी वंचितचा प्रयत्न हाणून पाडला. काँग्रेस नेत्यांना आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर विश्वास नसल्याने वंचितला इंडी आघाडीत (Indi Alliance) घेण्यास विरोध होत आहे. यापूर्वीही वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे.

(हेही वाचा – BJP : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपच्या प्रचार गीतानंतर आता घोषवाक्य)

उबाठा कोट्यातील जागा नको

काँग्रेसचा विरोध लक्षात घेता वंचित आघाडीने उबाठाला २४-२४ लोकसभा (Lok Sabha) जागा लढवण्याचा प्रस्ताव दिला असून उबाठा जर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले तर वंचित सर्व ४८ जागा लढणार असल्याचे एका नेत्याने सांगितले. काँग्रेस (Congress) नाही तर उबाठाशी जुळवून घेऊन महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) उबाठाच्या कोट्यातून काही जागा घेण्याचा प्रस्तावदेखील वंचितला अमान्य आहे. तसेच २३ जागांची मागणी केलेल्या उबाठाला काँग्रेस किती जागा देते यावर त्यांचे अवलंबून आहे.

१-२ जागांसाठी ४६ का सोडणार?

“१-२ जागांसाठी वंचित उबाठाशी युती करणार नाही. १-२ जागांसाठी आम्ही ४६ जागांवर का पाणी सोडू. आमच्याकडे उमेदवार आहेत, आमची तयारी आहे तर आम्ही लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवू,” असे वंचित आघाडीच्या एका नेत्याने स्पष्ट केले. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि उबाठाला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha Election) वंचित आघाडीला लाखावर मते मिळाली होती तर काँग्रेसचे (Congress) काही उमेदवार वंचितने घरी बसवल्याचे दिसून आले.

हेबी पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.