Lok Sabha Election 2024: वसंत मोरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर म्हणाले…

मनसेची भाजपासोबत युती होईल, अशी चर्चा आहे, याबाबत बोलताना वसंत मोरे म्हणाले की, मनसे या विषयावर मी बोलू इच्छित नाही. मी ज्या कारणसाठी पक्ष सोडला, त्या मुद्द्यावर आता मी काम करत आहे.

306
वंचितकडून Vasant More यांच्या उमेदवारीमागे शरद पवार?

मनसेमधून बाहेर पडलेल्या वसंत मोरे सध्या अन्य पक्षातील राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी गुरुवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. शुक्रवारी ते ठाकरे गटाचे संजय राऊत यांना सामना कार्यालयात जाऊन भेटले. यावेळी त्यांची तब्बल अर्धा तास चर्चा झाली. (Lok Sabha Election 2024)

यावेळी त्यांच्या भेटीनंतर मिडियाशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, मी माझी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर मांडली आहे. मला वाटतं, मला लोकसभेत पुण्यात संधी मिळेल. पुण्याच्या स्थानिक नेत्यांशी मी चर्चा करेन. पुणे लोकसभेची जागा कॉंग्रेसकडे आहे. मविआच्या नेत्यांना भेटत आहे. पुणेकरांच्या हितासाठी मला काम करायचे आहे, असे वसंत मोरे म्हणाले. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Samsung कडून Samsung.com, सॅमसंग शॉप अॅप आणि सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्समधील मेगा ऑफर्ससह होळी सेलची घोषणा)

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) एका पक्षात प्रवेश करणार का, असा प्रश्न यावेळी मोरे यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, ‘अजून भेटीगाठी सुरू आहेत. मागच्या दाराने मी भेटत नाहीए. थेट जाऊन भेटतोय. सगळ्या चर्चा सकारात्मक होत आहेत. सर्वच जण विचार करतील. पुण्यात वॉशिंग मशीन नको. मीसुद्धा याच मताचा आहे. शरद पवारांना भेटलो. कॉंग्रेसकडे जागा आहे, मोहन जोशींना भेटलो. रवींद्र धनगेकरांसोबत (Ravindra Dhangekar) फोनवरून बोलणं झालंय. पुण्याला गेल्यावर भाऊला भेटेन’, असेही मोरे म्हणाले.

मनसेची भाजपासोबत युतीची चर्चा…
मनसेची भाजपासोबत युती होईल, अशी चर्चा आहे, याबाबत बोलताना वसंत मोरे म्हणाले की, मनसे या विषयावर मी बोलू इच्छित नाही. मी ज्या कारणसाठी पक्ष सोडला, त्या मुद्द्यावर आता मी काम करत आहे. पुण्यातील नागरिकांच्या हितासाठी मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे. पुण्यात हुकूमशाहीसारखं वातावरण आहे. त्याविरोधात मी काम करतोय, असंही ते म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.