Lok Sabha Election 2024: नाशिकमध्ये ठाकरेंना दणका! मध्यरात्रीच उद्धव ठाकरे गटाचा नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेत

202
Lok Sabha Election 2024: नाशिकमध्ये ठाकरेंना दणका! मध्यरात्रीच उद्धव ठाकरे गटाचा नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेत
Lok Sabha Election 2024: नाशिकमध्ये ठाकरेंना दणका! मध्यरात्रीच उद्धव ठाकरे गटाचा नाराज नेता शिंदेंच्या शिवसेनेत

नाशिकमध्ये (Lok Sabha Election 2024) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. रविवारी (५ मे) मध्यरात्री अडीचच्या सुमारास ठाकरेंचा विश्वासू नेता शिवसेनेत आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) उपस्थितीत या नेत्याने पक्ष प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं नाशिकचं टेन्शन वाढल्याची चर्चा आहे. ठाकरेंसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. (Lok Sabha Election 2024)

उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र

नाशिकमधले ठाकरे गटाचे कार्यकर्ते विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे आणि पहाटे अडीच तीनच्या सुमारास मुंबईतल्या बाळासाहेब भवन या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी दादा भुसेही उपस्थित होते. विजय करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. (Lok Sabha Election 2024)

त्यांचा चेहरा पडदा फाडून मी समोर आणणार

“मी माझ्या पदांचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केला आहे. नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास मी इच्छुक होतो. मला आश्वासन देऊनही ते टाळलं गेलं. ज्या माणसाचं नावही चर्चेत नाही अशा माणसाला उमेदवारी देण्यात आली. आता गद्दार कोण आहे ते मी दाखवून देईन. ठाकरे गटात तत्व आणि सत्व दिसत नाही. ज्यांनी माझा घात केला आहे. त्यांना येणाऱ्या काळात कळेल. हे लोक एकनाथ शिंदेंना गद्दार बोलत आहेत. परंतु खऱ्या अर्थाने गद्दार पडद्याआड लपले आहेत. त्यांचा चेहरा पडदा फाडून मी समोर आणणार आहे.” असं विजय करंजकर यांनी म्हटलं आहे. (Lok Sabha Election 2024)

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आज विजय करंजकर आणि त्यांचे सहकारी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत आले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आहे. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आमच्यावर जे आरोप करत आहेत त्यांनी जरा स्वतःचं काय चाललं आहे ते बघितलं पाहिजे आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्यानंतर दुसऱ्यावर आरोप करायला हवे.” असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.