Lok Sabha Election 2024 : ‘विकसित भारत’ भाजपाच्या संकल्प पत्राचा गाभा

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचा गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर फोकस केला आहे. यामुळे त्यांच्याशी संबंधित समस्याचा सारासार विचार करून त्याचे निराकरण करण्यासाठी भाजपा (BJP) काय काय करणार आहे यावर विचार सुरु आहे.

177
BJP ची 99 उमेदवारांची यादी जाहीर; दोन आमदारांना डच्चू
BJP ची 99 उमेदवारांची यादी जाहीर; दोन आमदारांना डच्चू

भाजपाच्या (BJP) निवडणूक जाहीरनामा समितीची पहिली बैठक पार पडली. यात ”विकसित भारत’चा अजेंडा केंद्रस्थानी असल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने शनिवारी २७ सदस्यीय जाहीरनामा समिती स्थापन केली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना संयोजक आणि गोयल यांना सहसंयोजक बनवण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) निवडणूक जाहीरनामा समितीची पहिली बैठक सोमवारच्या रात्री पार पडली. केंद्रस्थानी सरकारच्या ‘विकसित भारत’चा अजेंडा आणि रूपरेषा होती. आगामी लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या महत्त्वाच्या आश्वासनांवर चर्चा करण्यासाठी आठ केंद्रीय मंत्री आणि तीन मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या इतर नेत्यांसोबत बैठक घेतली. संरक्षण मंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. (Lok Sabha Election 2024)

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने शनिवारी २७ सदस्यीय जाहीरनामा समिती स्थापन केली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना संयोजक आणि गोयल यांना सहसंयोजक बनवण्यात आले आहे. बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले की, पक्षाला मिस्डकॉल सेवेद्वारे ३.७५ लाखांहून अधिक सूचना मिळाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ॲपवर (NaMo) सुमारे १.७० लाख सूचना प्राप्त झाल्या आहेत. पीयूष गोयल म्हणाले, “२०४७ पर्यंत विकसित भारताच्या ब्लू प्रिंटवर बैठकीत चर्चा करण्यात आली. भाजपाच्या (BJP) जाहीरनाम्यातील जनतेचा उत्साहपूर्ण सहभाग पंतप्रधानांवरील त्यांचा विश्वास आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा दर्शवितो. लोकांकडून आलेल्या सर्व सूचनांचे विविध विभागांमध्ये विभाजन केले जाईल आणि त्यानंतर त्यावर चर्चा करून त्या मुद्द्यांना संकल्प पत्रात स्थान दिले जाईल. (Lok Sabha Election 2024)

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचा गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर फोकस केला आहे. यामुळे त्यांच्याशी संबंधित समस्याचा सारासार विचार करून त्याचे निराकरण करण्यासाठी भाजपा (BJP) काय काय करणार आहे यावर विचार सुरु आहे. समितीचे सहसंयोजक गोयल म्हणाले की, देशातील ३,५०० विधानसभा मतदारसंघात ९१६ व्हिडिओ व्हॅनही चालवण्यात आल्या आहेत. जाहीरनाम्यासाठी लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मते जाणून घेत आहेत. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, धर्मेंद्र प्रधान, स्मृती इराणी आणि राजीव चंद्रशेखर यांच्याशिवाय या समितीत पक्षशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि काही माजी उपमुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. गुजरातचे भूपेंद्र पटेल, मध्य प्रदेशचे मोहन यादव, आसामचे हिमंता विश्व शर्मा आणि छत्तीसगडचे विष्णू देव साई या मुख्यमंत्र्यांची नावे आहेत. तर शिवराज सिंह चौहान आणि वसुंधरा राजे या माजी मुख्यमंत्र्यांची नावे आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Naxal Attack: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, आठ नक्षलवादी ठार)

भाजपाच्या जाहीरनाम्याचे नाव ‘संकल्प पत्र’

समितीच्या इतर सदस्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राधामोहन दास अग्रवाल, राष्ट्रीय सचिव मनजिंदर सिंग सिरसा, ओपी धनखर, अनिल कुमार यांचा समावेश आहे. अँटनी. पक्षाचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंह हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या (BJP) जाहीरनामा समितीचे प्रमुख देखील होते. त्या समितीतील अनेक सदस्यांना सध्याच्या समितीत पुन्हा स्थान देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गेल्या महिन्यातच आपला जाहीरनामा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गेल्या महिन्यात ‘विकसित भारत मोदीज गॅरंटी’ व्हिडिओ वाहनाला हिरवा झेंडा दाखवला होता. त्याद्वारे पक्ष लोकांच्या सूचना घेतील आणि योग्य वाटतील त्या घोषणापत्रात समाविष्ट केल्या जातील. (Lok Sabha Election 2024)

भाजपा (BJP) आपल्या जाहीरनाम्याला ‘संकल्प पत्र’ म्हणतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करू शकतो. गेल्या अनेक दशकांतील ही पहिलीच वेळ आहे की भाजपच्या काही महत्त्वाच्या वैचारिक आश्वासनांचा निवडणूक जाहीरनाम्यात उल्लेख केला जाणार नाही. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात मोठे निर्णय घेतले जातील यावर पंतप्रधान मोदी अनेकदा भर देत आहेत. “गेल्या १० वर्षांत जे काही घडले ते फक्त ट्रेलर आहे, असे ते नुकत्याच एका कार्यक्रमात म्हणाले होते. सध्या देशाला खूप पुढे नेऊन भारताला विकसित भारत बनवायचा आहे, अशा स्थितीत जाहीरनाम्याच्या चर्चेला वेग आला आहे. लोकसभा निवडणुका १९ एप्रिल ते १ जून दरम्यान सात टप्प्यांत होणार आहेत. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.