Lok Sabha Election 2024 : कुलाबा मतदार संघात का झाले कमी मतदान, काय आहेत कारणे, जाणून घ्या!

270
Lok Sabha Election 2024 : कुलाबा मतदार संघात का झाले कमी मतदान, काय आहेत कारणे, जाणून घ्या!
Lok Sabha Election 2024 : कुलाबा मतदार संघात का झाले कमी मतदान, काय आहेत कारणे, जाणून घ्या!
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील (Lok Sabha Election 2024) कुलाबा विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी मतदान झाल्याचे पहायला मिळत आहे. या मतदारसंघाचे आमदार हे विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील कमी झालेल्या मतदानाची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे नार्वेकर यांनी स्वतः या मतदार संघाची जबाबदारी घेऊनही मतदान कमी झाले. या नार्वेकर यांचे शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी नसलेला समन्वय आणि मतदारांना बाहेर काढण्यासाठी न केलेला प्रयत्न हेच कारण पुढे येत आहे.

कुलाबा विधानसभा क्षेत्रात मतदानाच्या दिवशी सकाळच्या सत्रांत सर्वाधिक मतदान झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात दुपारनंतर मतदानात वाढ होणे अपेक्षित होते, पण तसे झालेले नाही. याबाबत स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कुलाबा विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) कमीच मतदान झाल्याचा आजवरचा इतिहास आहे. मात्र हे मतदान यंदा सर्वाधिक कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. या मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी महायुतीच्या वतीने ऍड. राहुल नार्वेकर यांनी स्वतःवर घेतली होती. परंतु त्यांचे इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय दिसून आलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी मनसेचा जाहीर पाठिंबा असूनही मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाच्यावतीने मांडलेल्या टेबल्सवर दिसून आले नाही. त्यामुळे मनसेने या निवडणुकीत काम केले असले तरी प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी दुपारनंतर मतदारांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न झाले नाही की भाजपाच्या कार्यकर्त्यांनी असा प्रयत्न केल्याचे दिसून आले नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अनेक टेबल्स ओस पडलेली पहायला मिळत होती,

(हेही वाचा – Dr. Dabholkar Murder प्रकरणात सनातन संस्था निष्कलंकित)

कुलाबा विधानसभा क्षेत्रात स्वत: ऍड नार्वेकर हे आमदार असून ऍड मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर हे दोन नगरसेवक आहेत. एकाच घरात एक आमदार आणि दोन नगरसेवक आहेत. त्यामुळे या मतदार संघात भाजपाचे प्राबल्य असल्याने कुलाब्यातून सर्वांधिक मतदान होणे अपेक्षित होते आणि या मतांच्या जोरावर महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाची रणनिती आखली होती. परंतु कुलाबा विधानसभा क्षेत्रात सर्वांत कमी म्हणजे ४३ टक्के मतदान झाल्याने महायुतीच्या उमेदवाराची धाकधुक वाढली गेली आहे. (Lok Sabha Election 2024)

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कुलाब्यातील अनेक मतदार संघांमध्ये सकाळच्या सत्रांत चांगल्या प्रकारे मतदान झाले असून हे सर्व मतदार इमारतींमधील होते. इमारतींमधील मतदार घराबाहेर पडल्याचे दिसून आले. त्यातुलनेत आंबेडकर नगर, गणेश मूर्ती नगर, शिवशास्त्रीनगर, मच्छिमार नगर ०१ ते ०५, आझाद नगर, सुंदर नगरी , गीता नगर अशा महत्त्वाच्या झोपडपट्ट्या आहेत. पण त्यातील मतदार अधिक प्रमाणात मतदानाला उतरला नाही. विधानसभा आणि महापालिकेत ज्याप्रकारे मतदान करतात,त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात मतदान होते त्याप्रमाणे या निवडणुकीत या वस्त्यांमधून नाही. त्यामुळे त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना बाहेर काढले गेले नसल्याचे बोले जात आहे. त्यामुळे एरव्ही संध्याकाळी होणारी मतदान केंद्रावरील गर्दी यावेळी दिसून आली नाही. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – BMC : डोंगर उतारावर राहत आहात, जबाबदारी तुमचीच; महापालिकेचा इशारा)

विशेष म्हणजे कुलाब्यातील मतदार हा सुज्ञ असून काही प्रमाणात मागील काही दिवसांमधील राजकारणातील बदल यामुळे मतदार बाहेर पडला नसल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या मतदार संघातन स्वत: नार्वेकर हे इच्छुक उमेदवार होते, परंतु त्यांना उमेदवारी न देता हा मतदार संघ शिवसेनेला सोडून यामिनी जाधव यांना उमेदवारी दिल्यामुळेही काही मतदार बाहेर पडला नसल्याचे बोलले जात आहे. तर काहींच्या मते हे कमी मतदान होण्यामागे लोकप्रतिनिधींप्रती असलेली नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि विद्यमान आमदार राहुल नार्वेकर यांच्या विरोधातील नाराजीचे कारण हे कमी मतदान असल्याचे बोलले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.