जयंतीबेन मेहतासारख्या अभ्यासू महिला लोकप्रतिनिधींना लोकसभेत पाठवणाऱ्या मुंबईतून दरवेळी एक तरी महिलेला लोकसभेत पाठवण्याची परंपरा आहे. काँग्रेसने वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक रिंगणात उतरवत परंपरा कायम ठेवली तशीच परंपरा चालू ठेवत दक्षिण मुंबईतून शिवसेनेकडून यामिनी जाधव (Yamini Jadhav) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Deepika Kumari in TOPS : स्पर्धात्मक तिरंदाजीतील पुनरागमनानंतर दीपिका कुमारीचा टॉप्समध्ये समावेश)
दक्षिण मुंबईतून (South Mumbai Lok Sabha election) शिवसेनेकडून भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू होतीच. मात्र, भाजपकडून यामिनी जाधव यांच्या नावाला विरोध होत असल्याने उमेदवारी घोषित करण्यासाठी काहीसा वेळ लागला. दरम्यान, राज्यातील महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी आतापर्यंत राज्यभरात १४ महिला उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. तर मुंबईत मात्र दोन महिला उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत राज्यभरात राजकीय पक्षांकडून एकूण १६ महिला उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024)
Join Our WhatsApp Communityलोकसभा निवडणूक – २०२४ साठी मुंबई दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. यामिनी यशवंत जाधव यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena pic.twitter.com/t3FL7mjvlB
— Shivsena – शिवसेना (@Shivsenaofc) April 30, 2024