Lok Sabha Election 2024 : वीर सावरकर यांचं नाव घेण्याची हिंमत तुमच्यात आहे का? अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

सिंधुदुर्गच्या भूमीवर मी आपल्यासमोर आज उभा आहे. ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला हिंदवी स्वराज्याची आठवण करून देतो, असं अमित शाह सुरुवातीला म्हणाले.

154
Lok Sabha Election 2024: वीर सावरकर यांचं नाव घेण्याची हिंमत तुमच्यात आहे का? अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर विद्यमान खासदार विनायक राऊत यांचं आव्हान असणार आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही यंदा ही जागा भाजपाला देण्यात आली. नारायण राणे यांच्यासाठी शुक्रवारी, ३ मे रोजी खुद्द केंद्रीय मंत्री अमित शाह प्रचारसभेसाठी कोकणात आले. वीर सावरकर यांचं नाव घेण्याची हिंमत तुमच्यात नाही, तर तुमची कसली शिवसेना, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. (Lok Sabha Election 2024)

सिंधुदुर्गच्या भूमीवर मी आपल्यासमोर आज उभा आहे. ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला हिंदवी स्वराज्याची आठवण करून देतो, असं अमित शाह सुरुवातीला म्हणाले. पुढे ते म्हणाले, ”मी आज सिंधुदुर्ग-रत्नागिरीत आलो आहे. तर एवढंच सांगेन की, आजच्या नकली सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात वीर सावरकर यांचं नाव भाषणात घेण्याची हिंमत आहे का? सावरकरांचं नाव घेण्याची हिंमत तुमच्यात नाही तर तुमची कसली शिवसेना. तुमची नकली शिवसेना आहे.”

१० वर्षांपूर्वी मनमोहन सिंग यांच्या काळात भारताची अर्थव्यवस्था ११व्या स्थानावर होती. गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली आहे. मोदींना पुन्हा एकदा मतदान केल्यास हीच अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येणारी आहे, असं शाह म्हणाले. मोदींना पंतप्रधान बनवण्याचा अर्थ आहे की, देश सुरक्षित आहे. काश्मीर आमचा आहे की नाही? काश्मीर आमचा आहे, पण खर्गे म्हणतात की, राजस्थान आणि महाराष्ट्रातील लोकांचा काश्मीरचा काय संबंध. रत्नागिरी सिंधुदुर्गातील लहान मुलगाही काश्मीरसाठी आपले प्राण देऊ शकतो, असंही अमित शाह म्हणाले.

(हेही वाचा – Hemant Soren: हेमंत सोरेन यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली)

“नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या दादागिरीसमोर भरपूर संघर्ष केला आहे. भाजपाने खूप मोठा चेहरा कोकणासाठी दिला आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड बहुमताने जिंकवण्याचं काम करा”, असं आवाहनही त्यांनी केलं.

इंडिया आघाडी देशाला सुरक्षित ठेवू शकत नाही
”पायाभूत सुविधांसाठी अनेक प्रकल्प मोदींनी महाराष्ट्रासाठी दिले आहेत. गुंतवणुकीत भारताने महाराष्ट्राला नंबर वन बनवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. हे लोक देशाचा विकास करू शकत नाहीत. देशाला सुरक्षित नाही ठेवू शकत. देशाला एक ठेवू शकत नाही. देशाच्या समस्या सोडवू शकत नाहीत. हिंदूंच्या समाधानासाठी काही करू शकत नाहीत”, असा हल्लाबोल अमित शाह यांनी विरोधकांवर केला. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.