Lok Sabha Election 2024: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड सुरक्षा प्रदान

189
Lok Sabha Election 2024: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड सुरक्षा प्रदान

इंटेलिजेन्स ब्युरो अर्थात आयबीने दिलेल्या थ्रेट परसेप्शन रिपोर्टनंतर गृह मंत्रालयाने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड सुरक्षा प्रदान केली आहे. (Lok Sabha Election 2024)

या निर्णयाबाबत आयबीचा थ्रेट परसेप्शन रिपोर्ट आला होता. त्या आधारावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. याअंतर्गत एकूण ३३ सुरक्षागार्ड तैनात असतात. आर्म्ड फोर्सचे १० आर्म्ड स्टॅटिक गार्ड व्हीआयपीच्या घरी तैनात असतात. ६ राऊंड द क्लॉक पीएसओ, ३शिफ्टमध्ये १२ आर्म्ड स्कॉर्ट कमांडे, २ वॉचर्स आणि ३ ड्रायव्हर तैनात असतात. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Raju Waghmare Join Shiv Sena : काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश )

भारताचा निवडणूक आयोग संविधानाच्या परिशिष्ट ३२४ मधील प्रावधानांनुसार देशाच्या राष्ट्रपतींद्वारा नियुक्त केला जातो. यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि २ अतिरिक्त निवडणूक आयुक्त यांचा समावेश असतो. निवडणूक आयोग १९५० मध्ये गठीत झाला होता. तेव्हापासून १५ ऑक्टोबर १९८९ पर्यंत आयोगामध्ये केवळ मुख्य निवडणूक आयुक्त हे एवढंच पद होतं. त्यानंतर १६ ऑक्टोबर १९८९ पासून १ जानेवारी १९९० पर्यंत तीन सदस्यीय आयोगाची नेमणूक करण्यात आली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.