Lok Sabha Election 2024 : ठरले तर मग! बारामतीत नणंद विरोधात भावजय असाच होणार सामना

194
कालपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024)  पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या माध्यमातून तुतारी चिन्हांवरून सुप्रिया सुळे निवडणूक लढवणार, अशी चर्चा आहे. तशी सुप्रिया सुळे यांची उमेदवारीही निश्चित झाली आहे. मात्र त्यांच्याविरोधात त्यांची भावजय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार अशी चोरदर चर्चा होती. आता ही चर्चा थांबली आहे. कारण अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या मतदार संघामधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार आहेत, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे या ठिकाणी पवार कुटुंबच एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहे.

सुनील तटकरे यांच्याकडून घोषणा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यंदा राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भात आता प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी घोषणाच केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची (Lok Sabha Election 2024) यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. कारण या मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच पवार कुटुंबातील दोन व्यक्ती आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि मतदारसंघातील विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात (Lok Sabha Election 2024) निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मात्र सुनेत्रा पवार यांच्या उमदेवारीची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, असे असताना काही दिवसांपूर्वी भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलेले वक्तव्य चर्चेत होते. तर आता थेट सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणाच केली आहे. मात्र, जर ही जागा महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीला सुटली तरच हे नाव निश्चित असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.