राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार (२७ मार्च) शेवटचा दिवस होता. आज सायंकाळ पर्यंत २२९ अर्ज दाखल झाले आहेत. (Lok Sabha Election)
पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूरचा समावेश आहे. (Lok Sabha Election)
(हेही वाचा – Mumbai South Central Lok Sabha Constituency : दक्षिण मध्य मुंबईत शेवाळे विरुद्ध देसाई, कोण ठरेल सरस?)
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रामटेक ५१, नागपूर ६२, भंडारा-गोंदिया ४९, गडचिरोली-चिमूर १९ आणि चंद्रपूर ४८ असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. (Lok Sabha Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community